नवी दिल्ली, 04 मार्च : जगभरात सध्या कोरोनाव्हायरसने (CoronaVirus) थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा धोका जाणवत आहे. भारतात सध्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या 28 वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यामुळं याचा प्रसार रोखण्यासाठी सरकार नवीन योजना आखत आहे. दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सगळ्यात सध्या दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये फोनवर बोलताना दिसत आहे. त्याचे बोलणे ऐकून असे काही झाले की, संपूर्ण मेट्रो रिकामी झाली. हा मजेदार व्हिडीओ टिकटॉकवर (TikTok) व्हायरल झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोक मास्क लावत आहेत. तर, दुसरीकडे TikTokवर काही मजेदार व्हिडिओ तयार केले जात आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मुलाने दिल्ली मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी फोनवर, मी सकाळीच चीनहून आलोय, असे म्हणाला आणि पुढच्या क्षणी संपूर्ण दिल्ली मेट्रो रिकामी झाली. हा व्हिडीओ कपिल कश्यप यांनी शेअर केला आहे.
@kapilkashyap628what an idea sir g#@realfunnyvideos @tiktok ##trending ##video #@1.million @theforyoupageoffical @tiktok_india
♬ original sound - VIKAS SHARMA
चीनमध्ये कोरोना विषाणूची सुरूवात झाल्यापासून तेथील सर्व कारखाने बंद आहेत ज्यामुळे भारतातील औषध कंपन्यांना आवश्यक कच्चा माल मिळत नाही. अशा परिस्थितीत देशभरात अत्यावश्यक औषधांचा अभाव लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका भारतात (India) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही (Maharashtra) कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली (New delhi), तेलंगणा (Telangana) , राजस्थान (Rajasthan) पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik) हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.