JOIN US
मराठी बातम्या / Viral / चाकू हल्ल्यापासून संरक्षण करणार हा टी-शर्ट! शरिरावर होणार नाही जखम, असा खरेदी करा!

चाकू हल्ल्यापासून संरक्षण करणार हा टी-शर्ट! शरिरावर होणार नाही जखम, असा खरेदी करा!

रस्त्यावर होणाऱ्या चाकू हल्ल्यापासून सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटनमधील एका कंपनीने खास टीशर्ट (T-Shirt to Protect from Knife Attack) तयार केले आहेत. चाकू हल्ला रोखण्यासाठी हा टीशर्ट अत्यंत (Knife Attack Body Armour) प्रभावी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : जगभरात शस्त्रास्त्र (Weapons) बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांची उलाढाल खूप मोठी असते. बदलत्या काळानुसार या कंपन्या प्रगत होत चालल्या आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून या कंपन्याकडून अत्याधुनिक शस्त्रांचे उत्पादन करत येत आहेत. तर दुसरीकडे आशा शस्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी विशेष उपकरणे देखील बनवण्यात येतात. शस्त्रास्त्र बनवणाऱ्या जागतिक कंपन्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा विचार सहसा करत नाहीत. विशेष करून त्याचे उत्पादन सुरक्षादलातील लोकांसाठी केले जाते. सामान्य नागरिकांसाठीही एक कंपनी पुढे सरसावली आहे. रस्त्यावर होणाऱ्या चाकू हल्ल्यापासून सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटनमधील एका कंपनीने खास टीशर्ट (T-Shirt to Protect from Knife Attack) तयार केले आहेत. चाकू हल्ला रोखण्यासाठी हा टीशर्ट अत्यंत (Knife Attack Body Armour) प्रभावी आहे. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यापासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणांमधून हत्या, चोरी, दरोडेखोरी होत आहेत. तसेच भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लूट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता खाबरण्याची गरज नाही. हे खास टीशर्ट हल्ल्यापासून तुमचे संरक्षण करेल. ब्रिटनमधील (British Armour Making Company) पीपीएसएस ग्रुप (PPSS Group) ही कंपनी शरीर संरक्षक कवच बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे संरक्षक कवच सर्वसामान्यांना खरेदी करता येते. बंदुकीची गोळी किंवा हत्यारांपासून बचाव करण्यासाठी या कंपनीने यापूर्वीही काही आर्मर तयार केले. पण या कंपनीने आता सामान्य नागरिकांसाठी चाकू हल्ल्यापासून (T-Shirt Stop Knife Attack) बचाव करणारे एक टीशर्ट तयार केला आहे.

चोरीच्या घटनांमध्ये चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटले जाते. मात्र, हे टीशर्ट घातल्यानंतर नागरिक चोराचा सामना करू शकतात आणि त्याला पळवून लावू शकतात. हे टीशर्ट कार्बन फाइबरपासून बनवण्यात आले आहेत. कार्बन अणूपासून बनवलेल्या 5-10 मायक्रोमीटरच्या फायबरला कार्बन फायबर म्हटलं जातं. हे कॉटन फाइबरच्या तुलनेत अधिक मजबूत असतं. जीव वाचवणाऱ्या या लाखमोलाच्या टीशर्टची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. हाफ स्लीव्ह व्ही-नेक टी-शर्टची किंमत सुमारे 16,000 रुपये आहे. तर फुल स्लीव्ह टी-शर्टची किंमत सुमारे 19 हजार रुपये आहे. या टीशर्टसंबंधित एक व्हिडिओ फॉसबाइट्स नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हल्ला केल्यानंतर हा टीशर्ट कसे आपले संरक्षण करतो, हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. जर तुम्हाला चाकू हल्ल्याची भीती असेल तर तुम्ही हे टीशर्ट खरेदी करून स्वत:चे संरक्षण करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या