JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रसिद्ध कॉमेडियनवर आली कांदे बटाटे विकण्याची वेळ? Photo व्हायरल होताच चाहते थक्क

प्रसिद्ध कॉमेडियनवर आली कांदे बटाटे विकण्याची वेळ? Photo व्हायरल होताच चाहते थक्क

**मुंबई, 23 जानेवारी : ‘**द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर अभिनेता, कॉमेडियन सुनील ग्रोवर आता चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याचं डॉ. मशहूर गुलाटी पात्र प्रेक्षकांना खूप आवडायचं. अजूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. आता सुनील पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो रस्त्यावर कांदे बटाटे विकताना दिसत आहे. त्याला अशा अवस्थेत पाहून त्याच्या चाहत्यांना तर थक्काच बसला.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 23 जानेवारी : ‘**द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर अभिनेता, कॉमेडियन सुनील ग्रोवर आता चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसतो. सुनीलला अजून कपिल शर्मामध्ये परत येण्यास चाहते विनंती करत असतात. त्याचं डॉ. मशहूर गुलाटी पात्र प्रेक्षकांना खूप आवडायचं. अजूनही प्रेक्षक त्याला शोमध्ये मीस करतात. कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाल्यामुळे सुनीलने हा शो सोडला होता. आता सुनील पुन्हा एकदा चर्चेत आला असून तो रस्त्यावर कांदे बटाटे विकताना दिसत आहे. त्याला अशा अवस्थेत पाहून त्याच्या चाहत्यांना तर थक्काच बसला. सुनील ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्रामवर नवा फोटो शेअर केला आहे. या नव्या फोटोमध्ये तो कांदे बटाटे विकताना दिसत आहे. सुनिलने फोटोसोबत ‘आमचा अत्रिया’ असं कॅप्शनही दिलं आहे. सुनीलची ही पोस्ट काही क्षणातच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. हा फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालताच कमेंटचाही वर्षाव होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

कांदे कसे दिले, कपिल शर्मा शो जॉईन कर ही परिस्थिती नाही येणार, सर तुम्हाला इंटस्ट्रीत काम नाही मिळाल्यावर इथे चान्स आहे, बटाटे केस दिले, इन्स्टाग्राम उघडताच तुमच्या हटके पोस्ट दिसतात, अशा अनेक कमेंट सुनील ग्रोवरच्या पोस्टवर येत आहेत. या पोस्टवरुन नेटकरीच नाही तर अनेक सेलिब्रिटीदेखील त्याची मजा घेत आहेत.

दरम्यान, आपल्या विनोदी शैलीने लोकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवर सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून विविध फोटो आणि मजेशीर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या विनोदाचे अनेक चाहते असून तो आपल्या चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या