JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / PHOTO: कोरोना काळात पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा नेमकं कसं काम करतं

PHOTO: कोरोना काळात पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा नेमकं कसं काम करतं

Gol-gappa\ panipuri Machine: पाणीपुरी अनेकांचा विक पॉईंट असतो. पाणीपुरी बनवून देणारा त्याच्या हाताने पुरी बनवून देतो. पण आता ग्राहकांना आपल्या स्वत:च्या हातानेच 6 प्रकारच्या फ्लेवरची पाणीपुरी बनवून खाता येणार आहे. कोरोना काळात दुकानदाराच्या हाताने पाणीपुरी बनवण्याची गरज लागणार नाही. ग्राहक स्वत:च 6 प्रकारचं पाणीपुरीचं पाणी आपल्या हाताने घेऊ शकतात.

0105

पाणीपुरी चाहत्यांसाठी एक खास मशिन लावण्यात आलं आहे. या मशिनने अनेकांना आकर्षित केलंय. ही मशीन लावण्यात आल्यानंतर, कोरोना काळात आता लोकांना पाणीपुरी खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. (Photo: News18)

जाहिरात
0205

कोरोनापासून वाचण्यासाठी अमृतसरमध्ये एक असा पाणीपुरीवाला समोर आला आहे, जो स्पर्श केल्याशिवाय पाणीपुरी बनवतो. मशीनद्वारे ते पाणीपुरीसाठी लागणारं 6 प्रकारचं पाणी तयार करतो. (Photo: News18)

जाहिरात
0305

अमृतसरमधील शास्त्री मार्केटमध्ये पाणीपुरीची ही मशिन लावण्यात आली आहे. या मशिनमुळे ग्राहकांना पाणीपुरी बनवणाऱ्याच्या हातून पाणीपुरीचं पाणी टाकून घेण्याची गरज लागणार नाही. मशीनद्वारेच ग्राहक स्वत: हवं असलेलं 6 प्रकारचं पाणी टाकून घेऊ शकतात. (Photo: News18)

जाहिरात
0405

दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात काम ठप्प झालं होतं. परंतु आता अनलॉकमध्ये पाणीपुरीचं मशीन लावल्यानंतर, पुन्हा एकदा ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पंजाबमधील हे अशाप्रकारचं पहिलंच मशीन आहे. (Photo: News18)

जाहिरात
0505

मशीनमुळे कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी वाटतेय. याठिकाणी पाणीपुरी खाणं सुरक्षित वाटतं. पाणीपुरीला दुकानदार हात लावत नाही, आम्ही स्वत:चं पुरीमध्ये मशीनद्वारे हवं ते पाणी घेतो, ही अतिशय चांगली बाब, असल्यास येथील ग्राहकांनी सांगितलं आहे. (Photo: News18)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या