तुम्हाला दिसतेय का यामध्ये मांजर?
मुंबई 29 नोव्हेंबर : सोशल मीडियावर अनेक मनोरजंक गोष्टी आपल्याला सापडतात. सध्या ऑप्टिकल इल्युजनचे खेळ चांगलेच चर्चेत आहेत. दृष्टिभ्रमाच्या या खेळात फोटो किंवा चित्रात लपलेल्या गोष्टी शोधून काढणं अशक्यच असतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे केवळ तुमच्या नजरेची पारख होत नाही, तर तुमच्या बुद्धीचा कस लागतो आणि संयमाची परीक्षाच ठरते. तसंच तुमची मानसिकता कशा प्रकारची आहे याचीही पडताळणीही होते. सध्या एक चित्र चांगलंच व्हायरल झालं आहे. या चित्रात एक मांजर लपली आहे. ही मांजर शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा अवधी आहे. या व्हायरल चित्राबद्दल जाणून घेऊ अधिक माहिती. कसलं आहे हे चित्र? तुमच्यासमोर एका कपाटाचं चित्र आहे. या कपाटात भरपूर कपडे हँगरला अडकवलेले आहेत. तसंच जमिनीवरही काही कपडे दिसत आहेत. याशिवाय तुम्हाला चित्रात बॅग आणि चपला, बूटही दिसत आहेत. या सगळ्या गोष्टींच्या आड एक मांजर लपली आहे. तुम्हाला 10 सेकंदांत ही मांजर शोधायची आहे. तुम्ही जर मांजर शोधू शकत असाल तर तुमची निरीक्षणशक्ती ही तीक्ष्ण आहे असं म्हणायला हवं. परंतु, तुम्हाला जर चित्रात मांजर दिसतं नसेल, तर निराश होण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, मांजर कुठे लपली आहे. चित्र नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, मांजर तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. तरीही अनेक निष्णात नेटिझन्सना ती मांजर शोधणं अशक्य झालंय.
हे घ्या तुमचं उत्तर तुम्ही या चित्राकडे नीट लक्षपूर्वक पहा. चित्रात उजव्या बाजूस बॅग ठेवली आहे. त्या बॅगसच्या डाव्या बाजूस काही चपला, शूज ठेवले आहेत. उजवीकडून पाहताना चप्पल ठेवलेला जो पहिला कप्पा आहे, त्यावर एक कापड लटकताना दिसतंय. या कापडाच्या पाठीमागे एक मांजर लपलं आहे. आता तुम्हाला नक्कीच लपलेलं मांजर दिसेल. तरीही, तुम्हाला मांजर दिसत नसेल, तर खाली दिलेला फोटो पाहा. या फोटोत पिवळ्या रंगाच्या हायलायटरच्या आत तुम्हाला काळ्या रंगाची मांजर लपलेली दिसेल.
आता तरी दिसली का मांजर?
दृष्टिभ्रमाच्या या कोड्यात मेंदूला चांगलीच चालना मिळते. कारण नजरेला दिसणारी वस्तू तुमच्या मेंदूत इतकी घट्ट बसते की, त्यातली साधी गोष्टही शोधून काढणं अवघड बनतं. यासाठी तल्लख मेंदू आणि तीक्ष्ण नजर असल्यासच कोडं सोडवणं शक्य होईल.