Snake in Bathroom: कमोडशेजारी फणा काढून बसलेला विषारी कोब्रा पाहून नवऱ्याने थेट बेडरुममध्ये धुम ठोकली…
रात्रीच्या अंधारात बाथरूममध्ये गेल्यावर जर समोर एक मोठा कोब्रा फणा काढून पसरलेला दिसला, परिस्थिती काय असेल? विचार करुनही भीती वाटते. पण ही घटना प्रत्यक्षात भिलाईच्या प्रगती नगरात राहणाऱ्या कुटुंबासोबत घडली. रात्री तीनच्या सुमारास घरातील सदस्य बाथरूमला जाण्यासाठी उठला, तेव्हा समोरच्या कमोडजवळ एक कोब्रा साप बसलेला दिसला.
कसं तरी जीव वाचवून किरण साहू तेथून पळाले आणि मागे वळूनही पाहिलं नाही काही वेळाने त्यांनी तातडीने पत्नी संजू साहू ज्या व्यवसायाने नर्स आहेत, त्याना याची माहिती दिली. त्यांनी मोठ्या समजूतदारपणे सापांचं रेस्क्यू काम करणारे अजय कुमार यांना माहिती दिली.
मग रात्री कोब्रा पकडण्याचं काम सुरू झालं. अजय कुमारने मोठ्या हिमतीने कोब्राला रेस्क्यू केलं कोब्रा सुमारे 5 फूट लांब होता आणि तो घराच्या व्हेंटिलेशनमधून आत आला अजय कुमार म्हणतात की उन्हाळ्यात, थंड जागा शोधण्यासाठी अनेकदा साप घराबाहेर पडतात, पण त्यांना मारू नये.
कारण तोही निसर्गाचा एक भाग आहे. सापांना पाहून घाबरण्याऐवजी एखाद्या अनुभवी व्यक्तीला याची माहिती द्यावी, असंही त्यांनी सांगितलं सापाशी छेडछाड केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकता।
त्याच वेळी अजय कुमार म्हणाले की, नोवा नेचर संस्था गेली 12 वर्षे सर्पांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. त्यांनी 18 हजारांहून अधिक विषारी साप सुरक्षितपणे रेस्क्यू केले आहेत आणि त्यांना जंगलात सोडले.