JOIN US
मराठी बातम्या / Viral / सकाळी टीन, संध्याकाळी बाटली; बिअरप्रेमी माकडामुळे शॉप मालक हैराण, Video पाहाच!

सकाळी टीन, संध्याकाळी बाटली; बिअरप्रेमी माकडामुळे शॉप मालक हैराण, Video पाहाच!

‘या माकडामुळे आम्ही खूप वैतागलो आहोत. हे माकड केवळ ग्राहकांकडून दारू हिसकावून घेत नाही, तर दुकानातल्या बाटल्यांचंदेखील…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : सोशल मीडियावर विविध प्राण्यांचे खास व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. नेटिझन्सकडून अशा व्हिडिओजना विशेष पसंती मिळत असते. आतापर्यंत तुम्ही माणसांना मद्यपान करताना पाहिलं असेल. अनेक पार्ट्यांचे व्हायरल व्हिडिओदेखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या गोष्टीत नावीन्य असं काहीच नाही; पण सध्या सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक माकड मद्यपान करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. बीअरचा कॅन हातात धरून एक माकड दारू पीत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. माकडाच्या या रोजच्या कृत्यामुळे संबंधित दारू विक्रेता त्रस्त असून, वन विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी त्याने केली आहे. बऱ्याचदा नागरी भागात माकडांनी गोंधळ घातल्याच्या तक्रारींविषयी आपण ऐकतो, वाचतो; पण उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीमधल्या गदागंज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या अचलगंज येथे एक माकड चक्क मद्यपान करत असल्याचं समोर आलं आहे. हे माकड हातात कॅन घेऊन बीअर पीत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. या माकडाला दारू फार आवडते. एखादी व्यक्ती वाइन शॉपवर मद्य खरेदीसाठी आली, की हे माकड त्याच्याकडून दारू हिसकावून घेतं आणि लगेच पिऊन टाकतं, असं सांगितलं जात आहे. बीअरचे कॅन काही मिनिटांत संपवणारं हे माकड वाइन शॉप मालकासाठी डोकेदुखी ठरलं आहे. माकड मद्यपान करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत वन विभाग कारवाई करेल. या माकडाला तेथून दूर नेलं जाईल, अशी माहिती रायबरेलीचे जिल्हाधिकारी आर. पी. सिंह यांनी दिली. या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर ते माकड त्यांना चावण्यासाठी धावतं, असं सांगितलं जात आहे.

या वाइन शॉपमध्ये काम करणारे सेल्समन श्याम सुंदर यांनी सांगितलं, ‘या माकडामुळे आम्ही खूप वैतागलो आहोत. हे माकड केवळ ग्राहकांकडून दारू हिसकावून घेत नाही, तर दुकानातल्या बाटल्यांचंदेखील नुकसान करतं. आम्ही त्याला हकलवून लावायचा प्रयत्न केला, तर माकड आम्हाला चावायला धावते.’

सिंधुदुर्गच्या रस्त्यावर आली मगर, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक थांबताच…; थरकाप उडवणारा VIDEO

वाइन शॉपच्या मालकाने सांगितलं, ‘आम्ही या प्रकाराबाबत अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली; पण तुम्हीच त्या माकडाला हकलवून द्या, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला; मात्र हा प्रकार मीडियातून निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाची मदत घेण्यात येईल, असं सांगत आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या