**मुंबई, 23 नोव्हेंबर :**साधारण ऑक्टोबर महिन्यापासून हिवाळा ऋतू सुरू होतो. मात्र, या वर्षी पावसाळा लांबल्यानं आणि वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळे नोव्हेंबरचा पहिला पंधरवाडा उलटला तरी वातावरणात हिवाळ्यासारखा गारवा जाणवत नव्हता. पण, आता हळूहळू थंडी वाढू लागली असून, येत्या काही दिवसांत काही राज्यांना थंडीच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. हिवाळ्यात थंड पाण्यामध्ये बोटही घालावंसं वाटत नाही. हिवाळ्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण फार जास्त असतं. बहुतेकांना सर्दी-खोकल्याची समस्या जाणवते. आजारी पडू नये म्हणून काहीजण तर हिवाळ्यात दररोज आंघोळ करण्याचंही टाळतात. कारण, आंघोळीसाठी गरम पाणी जरी घेतलं तरीही हिवाळ्याच्या दिवसांत जास्त थंडी लागण्याची शक्यता असते. हिवाळ्यातील आंघोळीबाबत मजेशीर परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलानं थंडीत आंघोळ करण्याचं निंजा टेक्निक अवलंबलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा - VIDEO - बंद लिफ्टमध्ये तरुण काढत होता छेड; एकट्या तरुणीने तिथंच केला त्याचा ‘गेम’ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @tololmeroket नावाच्या आयडीवरून हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी पाण्याचा मग घेऊन उभा आहे. समोर ठेवलेल्या बादलीतून मगभरून पाणी घेतो. पण, तो अंगावर ओतून घेत नाही. तो पाण्याचा मग खांद्याजवळ घेऊन खाली पाणी ओततो. दुसऱ्या खांद्याच्याबाबतही तो असाच प्रकार करतो. डोक्यावर पाणी घेण्याऐवजी पाठीमागील बाजूला पाणी ओतून देतो. यानंतर तो फक्त दोन बोटं पाण्यात भिजवतो आणि त्याद्वारे डोळे स्वच्छ करतो. शेवटी आरामात बाथरूममधून बाहेर पडतो आणि खोलीत जातो.
पाण्याचा एक थेंबही अंगावर न घेता अगदी थंड पाण्याने आंघोळ केल्याच्या थाटात व्हिडिओतील मुलगा बाहेर येतो. आंघोळ करण्याचं असं निंजा टेक्निक तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ सात लाख 33 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 31 हजारांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. काही युजर्सनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतेकांनी खळखळून हसण्याच्या इमोजी कमेंट सेक्शमध्ये पोस्ट केल्या आहेत.