JOIN US
मराठी बातम्या / Viral / घागरा घालून तरुणीचा सायकलवर भन्नाट डान्स, धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा Video

घागरा घालून तरुणीचा सायकलवर भन्नाट डान्स, धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा Video

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओमुळे कोण कधी सोशल मीडियावर चर्चेत येईल याचा काही नेम नाही.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओमुळे कोण कधी सोशल मीडियावर चर्चेत येईल याचा काही नेम नाही. दिवसभरात अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. याशिवाय काही व्हिडीओ धक्कादायक असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ सगळयांचं लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुणी घागरा घालून सायकलवर बसून डान्स करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी सायकलवरून आपले कौशल्य दाखवत आहे. ती चक्क घागरा परिधान करुन डान्स करत आहे. आणि त्याच वेळी ती सायकल देखील चालवत आहे. ‘दिल है तुम्हारा’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘दिल लगा लिया…’ या लोकप्रिय गाण्यावर ती डान्स करत आहे. तरुणीला रस्त्यावर भरधाव वेगाने सायकल चालवताना नाचताना पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

संबंधित बातम्या

@iamsecretgirl023 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या तरुणीच्या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे. तरुणीच्या आत्मविश्वासाचं नेटकरी कौतुक करत असून व्हिडीओवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. तरुणीच्या कौशल्याचंही कमेंटमध्ये जोरदार कौतुक होतना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप वेळा पाहिला जात असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आपलं कौशल्य दाखवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे अनेकजण याचा चांगला उपयोग करताना दिसतात. आपलं कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवतात. लोकंही अशा व्हिडीओजला चांगला प्रतिसाद देताना दिसतात. यामुळे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असलेले पहायला मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या