JOIN US
मराठी बातम्या / विदेश / World’s strongest kid: वयाच्या तिसऱ्या वर्षी 48 Kg वजन; 'वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट किड'ची अनोखी कहाणी

World’s strongest kid: वयाच्या तिसऱ्या वर्षी 48 Kg वजन; 'वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट किड'ची अनोखी कहाणी

त्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी त्याचं वजन 146 किलो (322 पौंड) होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जानेवारी : बदलत्या जीवशैलीमुळे (Life Style) आणि कोरोना महामारीमुळे (corona pandemic) लहान मुलांची शारिरीक हालचाल कमी झाली आहे. याचा परिणाम मुलांच्या वजनावर होत आहे. सध्याच्या काळात लहान मुलांमधला लठ्ठपणा (Obesity) ही अतिशय चिंतेची बाब ठरत आहे. अनेक मुलांचं वजन आपल्या वयाच्या तुलनेत किती तरी जास्त आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या चिंतेत वाढ झाली असून, काही पालकांनी तर मुलांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्लादेखील घेण्यास सुरुवात केली आहे. ही तर झाली आत्ताची स्थिती; मात्र कोरोना येण्याच्या साधारण दोन दशकांपूर्वी एका अशा मुलाचा जन्म झाला होता, ज्याचं वजन वयाच्या तिसऱ्या वर्षीच एखाद्या पहिलवानाइतकं होतं! Dzhambulat Khatokh (झांबुलात खातोख) असं या मुलाचं नाव होतं. या मुलाने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी ‘वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट किड’ (World’s strongest kid) होण्याचा विक्रम केला होता. वयाच्या नवव्या वर्षी त्याचं वजन 146 किलो (322 पौंड) होतं. त्यानंतर त्यानं काही काळ सुमो रेसलिंगही (Sumo wrestling) केलं; मात्र वाढत्या वयानुसार त्याचं वजनही खूप वाढलं आणि अगदी तरुण वयातच त्याचा मृत्यू झाला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

संबंधित बातम्या

24 सप्टेंबर 1999 रोजी रशियामध्ये (Russia) Dzhambulat Khatokh चा जन्म झाला होता. जन्माच्या वेळी त्याचं वजन सामान्य बाळाइतकंच होतं. नवजात Dzhambulat Khatokh 2.89 किलो वजनाचा होता; मात्र वाढत्या वयासोबत त्याच्या वजनामध्ये अनपेक्षित वाढ झाली. एक वर्षाचा असताना त्याचं वजन 13 किलो झालं होतं. वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत गेल्यानंतर त्याच्या शाळेतल्या मुलांनी त्याला ‘ग्लॅडिएटर’ नावानं चिडवण्यास सुरुवात केली होती. तेव्हा त्याचं वजन 95 किलो होतं. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत तर तो 146 किलोचा झाला होता. आपल्या अवास्तव वजनामुळे Dzhambulat Khatokh जगभरात प्रसिद्ध झाला होता. अनेक न्यूजपेपर्स आणि टीव्ही न्यूज चॅनेल्सवर त्याच्या बातम्या आल्या होत्या; पण त्याच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना त्याच्या वाढत्या वजनाची खूपच चिंता होती. इयान कॅम्पबेल (Ian Campbell) या ब्रिटिश डॉक्टरांनी 2009 मध्ये त्याची तपासणी केली होती. तपासणीनंतर मुलाची प्रकृती गंभीर असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, वाढलेल्या वजनामुळे त्याला डायबेटीस, कॅन्सर आणि हार्ट डिसीजेसचा सर्वांत जास्त धोका होता. अवजड शरीरामुळे त्याचं आयुष्य खूप कमी असेल, अशा इशाराही त्यांनी दिला होता. Dzhambulat Khatokh च्या वाढलेल्या वजनासाठी त्याची आई ‘नेल्या’वर आरोपदेखील झाले होते. आपल्या मुलाला सुमो पहिलवान करण्याची इच्छा असल्यानं नेल्यानं त्याला स्टेरॉइड्सची इंजेक्शन्स (Steroid injections) दिली, असे आरोप आईवर झाले होते; मात्र सर्व आरोपांचं ‘नेल्या’ने खंडन केलं होतं. ‘माझा मुलगा आहे तसाच जन्माला आलेला आहे. मॉस्कोतल्या क्लिनिकमधले त्याचे मेडिकल रिपोर्ट (Medical Reports) पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल, की त्याला फक्त वजन वाढीची समस्या आहे. त्याचे ऑर्गन स्कॅन आणि हॉर्मोन टेस्ट रिपोर्ट्स (Hormone test reports) नॉर्मल आहेत. लोकांना वाटतं, की त्याच्या या स्थितीला मी जबाबदार आहे; मात्र यात काहीही तथ्य नाही. मी त्याची आई आहे. मी दोन वर्षांच्या बाळाला स्टेरॉइड कसं देईन? माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे,’ अशी भावनिक प्रतिक्रिया खातोखच्या आईनं दिली होती. ‘तो आपल्या भावाप्रमाणे सामान्य आहारच घेत होता. तो कधीही जास्त खात नव्हता. त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तो थोडं जास्त जेवत असे; पण तो प्रौढांपेक्षा नक्कीच जास्त जेवत नव्हता,’ असंही नेल्याने स्पष्ट केलं होतं. खातोखनं आपल्या शरीराचा उपयोग कुस्तीसाठी करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानं सुमो रेसलिंग खेळण्यास सुरुवात केली. खसान तेउस्वज़ुकोव (Khasan Teusvazhukov) हे त्याचे रेसलिंग कोच (Wrestling coach) होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला ट्रेनिंग देण्यात अनेक अडचणी आल्या; मात्र त्यानं स्वत: हार मानली नाही. त्याने अनेक विजेतेपदंही मिळवली होती. दरम्यान, वयाच्या 17व्या वर्षी त्याचं वजन सुमारे 230 किलो झालं होतं. त्यानंतर त्याने डॉक्टरांच्या इशाऱ्याकडं गांभीर्यानं लक्ष दिलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यानं 176 किलो वजन कमी केलं होतं; मात्र एक दिवस अचानक त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नसलं, तरी किडनीच्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या