JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अभिमानास्पद! जो बायडन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात भारतीय वंशाची महिला रॅपर करणार परफॉर्म

अभिमानास्पद! जो बायडन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात भारतीय वंशाची महिला रॅपर करणार परफॉर्म

भारतीय- अमेरिकन रॅपर राजा कुमारी (Raja kumari) या जो बायडन यांचा शपशविधी कार्यक्रम Asian American Pacific Islander (AAPI) मध्ये परफॉर्म करणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जानेवारी: जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिका (America) देशातील राजकारणांत अनेक भारतीय वंशाच्या (Indian race) लोकांची वर्णी लागली आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उप राष्ट्राध्यक्ष (Vice president) कमला हॅरिसदेखील (Kamala haris) भारतीय वंशाच्या आहेत. तसेच भारतीय वंशाच्या महिला उजरा जेया (Ujra jeya) यांची देखील जो बायडन (Joe biden) यांच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. उजरा जेया यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात नागरी संरक्षण, लोकशाही आणि मानवाधिकार मंत्री म्हणून नेमलं आहे. हे बाब समस्त भारतीयांसाठी कौतुकास्पद आहे. आता ही यादी वाढतचं चालली आहे. कारण यामध्ये आणखी एका भारतीय महिलेचा समावेश झाला आहे. जी जो बायडन यांच्या शपथ विधी कार्यक्रमांत (oath ceremony) परफॉर्म करणार आहे. या भारतीय वंशाच्या महिलेचं नाव राजा कुमारी असून ती एक रॅपर आहे. तिला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं आहे. भारतीय- अमेरिकन रॅपर राजा कुमारी या जो बायडन यांचा शपशविधी कार्यक्रम Asian American Pacific Islander (AAPI) मध्ये परफॉर्म करणार आहे. यावेळी राजा कुमारी म्हणाल्या की,  त्या वांशिक भेदभाव आणि मतभेदाच्या पलिकडे जावून एकसंध अमेरिकेचं स्वप्न त्या पाहत आहेत. AAPI हा कार्यक्रम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या उद्धाटन कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. ज्यामध्ये राजाकुमारी यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कोविड -19 विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेवून यावर्षीच्या शपथविधी कार्यक्रमाचे सर्व परफॉर्मंस ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले आहेत. एका मुलाखतीत राजाकुमारी म्हणाल्या की, “AAPI मध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो.” कोण आहेत राजा कुमारी ? राजा कुमारी यांचं खरं नाव श्वेता यल्लाप्रगदा राव (Svetha Yallapragada Rao) असं आहे. भारतीय वंशाच्या श्वेताचे आई-वडील तेलगू आहेत, पण त्यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला आहे. त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्या गाणी लिहितात, गातात आणि सादरही करतात. त्यांनी रिलीजिअस स्टडीमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. त्यांना भारतीय सांस्कृतिक नृत्य देखील येतं. राजा कुमारी या वयाच्या  अवघ्या 7 व्या वर्षी कुचीपुडी, कथक आणि भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्यात पारंगत झाल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या