JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / सौंदर्यामुळे हिला पडतात शिव्या, सांगते जगावेगळं दुःख; पाहा PHOTOs

सौंदर्यामुळे हिला पडतात शिव्या, सांगते जगावेगळं दुःख; पाहा PHOTOs

स्लोवाकियाची 25 वर्षांची मॉडेल वेरोनिका राजेशनं आपलं जगावेगळं दुःख सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. आपल्या सौंदर्यावर अनेकजण जळतात आणि आपल्याशी त्यामुळे फटकून वागतात, असा दावा तिने इन्स्टाग्रामवरून केला आहे. अनेकांना आपलं सौंदर्य हे कृत्रिम वाटतं, असं तिनं म्हटलं आहे. तर अनेक तरुणी तिच्या जवळही येत नाहीत. आपला बॉयफ्रेंड आपल्याला सोडून हिच्याकडे निघून जाईल, अशी भीती तरुणींना वाटते.

0107

Miss Slovakia 2016 सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेली वेरोनिका सध्या इन्स्टाग्रामवर मॉडेलिंग करते. आपण जितके सुंदर दिसतो, तितके प्रत्यक्ष नाही, असं लोकांना वाटत असल्याचं ती म्हणते.

जाहिरात
0207

वेरोनिकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आणि तिच्याविषयी उलटसुलट चर्चा होत असतात. आपलं सौंदर्य हेच त्यामागचं खरं कारण असल्याचं ती सांगते. आपलं सौंदर्य पचवणं लोकांना जड जात असल्याचा तिचा दावा आहे.

जाहिरात
0307

25 वर्षांच्या या स्लोवाकियन मॉडेलच्या सौंदर्याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्लॅस्टिक सर्जरी केल्यामुळेच ती इतकी सुंदर दिसत असल्याचा दावा अनेकजण करतात.

जाहिरात
0407

आपण कुठलीही सर्जरी केलेली नाही, असं वेरोनिका सांगते. अनेकजण तर तिला एलियनही म्हणतात. इतकं सुंदर कुणी कसं असू शकतं, असा प्रश्न लोकांना पडतो.

जाहिरात
0507

ऑस्ट्रियात राहणारी ही मॉडेल इन्स्टाग्रामवर @veronikarajek या नावाने आपलं अकाउंट चालवते. आपल्या फोटोला फिल्टर्स लावून ते सुंदर केल्याच्या प्रतिक्रिया तिला नेहमीच येत असतात.

जाहिरात
0607

तिचे 10 लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. अनेकदा लोक जाड किंवा बारीक असण्यासाठी ट्रोल होतात. मात्र आपण परफेक्ट असण्यासाठी ट्रोल होत असल्याचं ती म्हणते.

जाहिरात
0707

स्वतःची काळजी घेतली, तर प्रत्येकजण आपल्याप्रमाणेच सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो, असं ती म्हणते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या