JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs

अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता प्रस्थापित केली असती, तरी परिस्थिती गोंधळाचीच आहे. मात्र या गोंधळात अफगाणिस्तानला होणारा तेलाचा पुरवठा (Oil Supply) मात्र अबाधित आहे. बँकादेखील (Banks) आता सुरु होत आहेत. अफगाणिस्तानमधील तेलाच्या व्यवसायातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जाणारे मीरवायज अजीजी (Mirvaij Azizi) हे सध्या दुबईत राहत असल्याची माहिती आहे.

0106

तेल आणि बँकिंग व्यवसायातील बेताज बादशहा अशी मीरवायज अजीजी यांची ओळख आहे. गोल चेहऱ्याचे आणि मजबूत बांधा असणारे अजीजी यांचा कारभार तेल, बँका आणि रिअल इस्टेट असा प्रचंड विस्तारलेला आहे. त्यांनी काबूल विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि 1988 सालीच ते देश सोडून दुबईला रवाना झाले.

जाहिरात
0206

अजीजी यांचा जन्म 1962 साली अफगाणिस्तानमधील लाघमन भागात झाला. अफगाणिस्तानात आता तालिबानची सत्ता आल्यामुळे अनेक उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अजीजी यांचा व्यवसाय अबाधित चालू राहिल, असं सांगितलं जात आहे.

जाहिरात
0306

अजीजी हे दुबईतूनच अफगाणिस्तानमधील आपला कारभार चालवतात. अजीजी ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आहेत. त्यांची कंपनी सध्या बँक, रिअल इस्टेट, गुंतवणूक आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही कार्यरत आहे. अफगाणिस्तानमधील बख्तर बँकेचेही ते मालक आहेत.

जाहिरात
0406

अफगाणिस्तानमध्ये आयात होणारं सुमारे 70 टक्के तेल हे अजीजी यांच्या कंपनीमार्फत येतं. याच तेलाचा वापर सध्या तालिबानदेखील करत आहे. अजीजी यांच्या मालकीच्या बँकांच्या अफगाणिस्तानमध्ये 80 शाखा आहेत, तर 110 एटीएम आहेत.

जाहिरात
0506

त्यांची वैयक्तिक मालमत्ता 80 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 600 कोटी रुपये इतकी आहे. अजीजी होटक ग्रुप नावाने त्यांची एक कंपनी तेलाचा व्यवसाय करते. या व्यवसाय 10 देशांमध्ये पसरला आहे.

जाहिरात
0606

अजीजी यांच्या पत्नीचं नाव परिगुल असं आहे. त्यांना 7 मुलं आहेत. त्यातील काही मुलं आता त्यांच्या व्यवसाय सांभाळत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या