हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्या बॅक्टेरियांमुळे होतो. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो.
कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.
या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात.
या आजाराचे नाव आहे ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague) आहे. उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सध्या दोन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्यापर्यंत लगेच पसरतो. यामुळेच शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडतात व सडतात.
ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.
जगभरात ब्यूबॉनिक प्लेगची सुमारे 3248 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांमध्ये, बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मेडागास्कर, पेरूमध्ये आढळून आली.
इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बयन्नुर यांनी प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्या टप्प्याचा इशारा दिला आहे. शनिवारी बयन्नुर येथील रूग्णालयात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना उघडकीस आल्या. स्थानिक आरोग्य विभागाने घोषणा केली की हा अलर्ट 2020 अखेरपर्यंत असेल.