JOIN US
मराठी बातम्या / विदेश / बापरे बाप! ज्वालामुखीच्या उद्रेकाने घरं होतायत बेचिराख, स्विमिंग पूलच्या पाण्याला फुटतेय उकळी, पाहा VIDEO

बापरे बाप! ज्वालामुखीच्या उद्रेकाने घरं होतायत बेचिराख, स्विमिंग पूलच्या पाण्याला फुटतेय उकळी, पाहा VIDEO

ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून बाहेर (Volcano erupts in Spain hot lava destroys homes) पडणारा लाव्हारस शहरात घुसला तर काय अवस्था होते, याची प्रचिती सध्या लोक घेत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

माद्रिद, 22 सप्टेंबर : ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून बाहेर (Volcano erupts in Spain hot lava destroys homes) पडणारा लाव्हारस शहरात घुसला तर काय अवस्था होते, याची प्रचिती सध्या लोक घेत आहेत. स्पेनच्या कॅनरी आयलंडमधील पाल्मा (Canary Island) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे आणि हा लाव्हारस सध्या इथल्या अलिशान घरांमध्ये घुसू लागला आहे. नागरिक याचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाहेर पडणारा लाव्हारस इतका उष्ण असतो की त्याच्या स्पर्शाने माणूस जळून जातो. असा लाव्हारस सध्या लोकांच्या घरात घुसतो आहे.

संबंधित बातम्या

केनरी आयलंडमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना घरं रिकामी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरं तर ही जागा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या जागेचा विकास झाला असून अनेकांनी इथं अलिशान घरं उभारली आहेत. आता या घरांमध्ये लाव्हारस घुसत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रस्त्यावर गरमागरम लाव्हा वाहत आहे. घरातील रिकाम्या जागांवर लाव्हा साठत आहे.

जाहिरात

या बेटावर तब्बल 50 वर्षांनंतर अशा प्रकारे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इथल्या पूर्ण परिसरात लाव्हारस पसरला आहे. अलिशान घरांचं यामुळे पूर्ण नुकसान होत आहे. स्विमिंग पूलमध्ये हा लाव्हारस जाऊन पडल्यानंतर पाण्याला उकळी फुटल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. आपल्या घरात आणि अंगणात लाव्हा आल्याचे व्हिडिओ नागरिक शेअर करत आहेत. मात्र नागरिकांनी या परिसरातून दूर जावं अशा सूचना प्रशासनानं केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या