JOIN US
मराठी बातम्या / विदेश / WHOच्या 'त्या' एका चुकीमुळे पसरला कोरोना, आरोग्य संघटनेवर धक्कादायक आरोप

WHOच्या 'त्या' एका चुकीमुळे पसरला कोरोना, आरोग्य संघटनेवर धक्कादायक आरोप

WHOचे संचालक टेड्रोस यांनी चीनला पाठीशी घातले असल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे.

जाहिरात

गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जिनीव्हा, 07 एप्रिल : कोरोनाने साऱ्या जगात थैमान घातले आहे. जगभरात 70 हजार लोकांना यामुळे मृत्यू झाला आहे. तरी, अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर लस किंवा औषध शोधता आली नाही आहे. या सगळ्या परिस्थितीला जागतिक आरोग्य संघटनेनेचे अध्यक्ष असल्याचा आरोप अमेरिकेतील नेत्यांनी केला आहे. त्यामुळे WHOचे महासंचालक टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. चीनने कोरोनावर केलेली मात हा WHOचा कट असल्याची शंका काहींनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूबाबत WHO चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर विसंबून राहिल्याबद्दल अमेरिकन राजकारण्यांनी या संघटेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बऱ्याच पाश्चात्य देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनने कोरोना संसर्गाबाबत योग्य माहिती दिली नाही, त्यामुळे कोरोना जगभरात पसरला. अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर मार्था मॅकस्ली यांनी, WHOचे संचालक टेड्रोस यांनी चीनला पाठीशी घातले. यासाठी त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही काही प्रमाणात चीनकडून पारदर्शकता न ठेवल्याबद्दल दोषी आहेत, असेही म्हणाले. WHOचे प्रमुख टेड्रोस 55 वर्षांचे असून ते इथिओपियाचे आहेत. ट्रेडोसबाबत सिनेटचा सदस्य मॅकस्ली यांनी WHOने जगाला फसवले, असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी टेड्रोस यांनी चीनच्या पारदर्शकतेचेही कौतुक केले, त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. चीनवर विश्वास ठेवणे ही चूक मॅकस्ली यांनी, WHOने चीन सरकारवर विश्वास ठेवायला नको हवा होता. चीन सरकारने येथे उद्भवणारा व्हायरस लपविला आणि यामुळे अमेरिका व जगात विनाकारण लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे टेड्रोस यांनी आपली चूक मान्य करून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीली जगभरातून पाठिंबा मिळत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये जेव्हा चीनमध्ये 17 हजार 238 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तेव्हा टेड्रोस यांनी परदेशी प्रवास थांबविण्याची गरज नसल्याचे सांगितले. ही चूक साऱ्या जगाला महागात पडली. तर, काही लोकांच्या मते चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 40 लोकांचा मृत्यू झाला मात्र, त्यांनी मृतांचा आकडा 3300 सांगितला. चीनच्या अशा वागण्याला WHOने खतपाणी घातल्यामुळे कोरोना पसरल्याचे आरोप काही नेत्यांनी केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या