कॅलिफोर्निया, 22 मार्च : कोरोना व्हायरस सध्या जगभर धुमाकूळ घालत आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 13 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची प्रकरणं पाहिल्यानंतर असं समोर आलं आहे की, टेस्ट करण्यास होणारा उशीर यामुळं कोरोना पसरत आहे. आता अमेरिकेनं यावर पर्याय शोधला आहे. फक्त 45 मिनिटांत कोरोनाची चाचणी होणार असून त्याच्या डायग्नोस्टिक चाचणीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये संशियत रुग्णाबाबत 45 मिनिटात माहिती मिळते की त्याला लागण झाली आहे की नाही. सध्या यासाठी बराच वेळ लागत आहे. कोरोनाच्या संसर्गाचं लवकर निदान करण्याचं हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कॅलिफोर्नियातील एका कंपनीने म्हटलं की, शनिवारी याच्या चाचणीसाठी एफडीएनं परवानगी दिली होती. आता याचा वापर रुग्णालये आणि आपत्कालिन विभागात केला जाईल. कंपनी पुढच्या आठवड्यात या तंत्रज्ञानाला शिपिंगच्या माध्यमांतून इतरत्र पोहोचवण्याची तयारी करत आहे. एफडीएनं अशा प्रकारच्या चाचणीसाठी मंजुरी दिल्याचं जाहीर केलं आहे. एफडीएनं म्हटलं की,कंपनी 30 मार्चपर्यंत त्यांचं टेस्टिंगचं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. सध्याची चाचणी सरकारी आदेशानुसार होईल आणि नमुने एका लॅबमध्ये पाठवले जातील. तिथं रिपोर्ट जाहीर केला जाईल. हे वाचा : कोरोनाचा सामना करण्यासाठी सरसावले मदतीचे हात! 100 कोटींची मदत करणार हे उद्योगपती अमेरिकेतही रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसची चाचणी करण्यास यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुले लोकांच्या जीवाला असलेला धोका वाढत आहे. यामुळे डॉक्टर आणि नर्ससुद्धा बाधित होऊ शकतात. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे जवळपास 80 नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी संपूर्ण देशात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 354 इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक 74 रुग्ण आहेत. VIDEO शरद पवारांनी टाळ्या वाजवून मानले आभार, ‘जलसा’वरही टाळ्यांचा कडकडाट