JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ब्रिटनने सुरू केला लसीकरणाचा नवा फंडा; देत आहेत 'मिक्स अ‍ॅन्ड मॅच' Corona Vaccine

ब्रिटनने सुरू केला लसीकरणाचा नवा फंडा; देत आहेत 'मिक्स अ‍ॅन्ड मॅच' Corona Vaccine

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (New strain of coronavirus in UK)अक्षरश: आणिबाणी ओढवल्याचं चित्र आहे. या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी ब्रिटन हरप्रकारे प्रयत्न करतो आहे. पण काही शास्त्रज्ञांनी हे तर आरोग्याशी जुगार खेळल्यासारखं आहे, असं म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 2 जानेवारी : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा (new strain of corona) गंभीर धोका ब्रिटनला (Britain) वेढून आहे. त्यामुळे ब्रिटनने त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याच्या उद्देशाने आपल्या लसीकरणासंबंधीचं (Covid-19 Vaccination) धोरणच बदललं आहे. ब्रिटन आता ‘मिक्स अँड मॅच’ (mix and match) पद्धतीनं लसीकरण (Covid vaccine) करतो आहे. एखाद्या रुग्णानं घेतलेल्या लसीचा दुसरा डोस (dose) नेमका कुठल्या कंपनीचा घेतला हे माहीत नसेल किंवा पहिल्या लसीचा निर्माता कोण हेही ठाऊक नसेल तर एखादी इतर पर्यायी लस देता येऊ शकते असं तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी (health officials) म्हटलं आहे. हे धोरण पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांना (guidelines) छेद देणारं आहे. कारण या तत्वांमध्ये म्हटलं आहे, ‘अधिकृत कोविड - 19ची लस ही अदलाबदली करता येण्याजोगी नाही. शिवाय मिक्स्ड प्रॉडक्ट सिरीजची सुरक्षितता आणि प्रभावीपण यांचं मूल्यमापन केलं गेलेलं नाही. लसीकरणाचे दोन्ही डोस एकाच लसीचे असायला हवे.’ काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की ब्रिटन लसीच्या प्रकरणात जणू जुगार खेळतो आहे. ‘या मिक्स अँड मॅचच्या कल्पनेबाबत अजून कुठलाच डेटा उपलब्ध नाही. विज्ञानाला अव्हेरत केवळ एखादा आंधळा डाव खेळावा त्याप्रमाणं हे सगळं केलं जात आहे.’ असं याबाबत कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे जॉन मूर बोलले. ब्रिटनमधले आरोग्य अधिकारी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसंदर्भानं चांगलेच कोंडीत सापडले आहेत. अधिकाधिक लोकांनी लसीकरण करून घ्यावं असा त्यांचा प्रयत्न आहे. इथली रुग्णालयं कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींनी ओसंडून वाहत आहेत. दररोज नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. शुक्रवारी इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, की लंडनमधल्या शाळा पुढचे दोन आठवडे बंद राहतील. ब्रिटननं फायजर आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (Pfizer, Oxford- AstraZeneca) या दोन लसींना आणीबाणीच्या परिस्थितीतच हिरवा कंदील दाखवला आहे. ब्रिटनमध्ये नव्यानं लागू झालेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, लसीचे दोन्ही डॉस देताना एकाच कंपनीची लस वापरण्याचा हरप्रकारे प्रयत्न झाला पाहिजे. मात्र केवळ नाईलाज असेल तरच दुसरी लस वापरून डॉस पूर्ण केला जावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या