इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक शार्क(Shark) हल्ले झालं असून यामधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फ्लोरिडामधील एका व्यक्तीवर झालेल्या शार्क हल्ल्यानंतर तो जखमी अवस्थेत घरी आला. या जीवघेण्या हल्ल्यात कसेबसे त्याचे प्राण वाचले. पण त्यानं सांगितलेला अनुभव थरकाप उडवणारा होता. असेच आतापर्यंतचे सर्वात भयानक शार्कचे हल्ले आणि त्याचे अनुभव वाचा... (फोटो: Oddee.com)
इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक शार्क(Shark) हल्ले झालं असून यामधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फ्लोरिडामधील एका व्यक्तीवर झालेल्या शार्क हल्ल्यानंतर तो जखमी अवस्थेत घरी आला. या जीवघेण्या हल्ल्यात कसेबसे त्याचे प्राण वाचले. पण त्यानं सांगितलेला अनुभव थरकाप उडवणारा होता. असेच आतापर्यंतचे सर्वात भयानक शार्कचे हल्ले आणि त्याचे अनुभव वाचा... (फोटो: Oddee.com)
1945 प्रशांत महासागरात शार्कचा हल्ला या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात सैनिकांचा मृत्यू झाला होता. 1945 मधील महायुद्धात जपानने अमेरिकन सैन्यावर केलेल्या हल्ल्यात युद्धनौकेचं मोठं नुकसान झालं होतं. या हल्ल्यात 900 सैनिकांपैकी केवळ 317 जण वाचले होते. (फोटो: Oddee.com)
<strong>2003 मधील महिलेवर हल्ला </strong><br /> या हल्ल्यामध्ये या 13 वर्षाच्या सर्फरला आपला हात गमवावा लागला होता. बेथनी हॅमिल्टन नावाच्या या सर्फरने पाण्यात हात टाकल्यानंतर शार्कने तिच्यावर हल्ला केला होता. 2003 मध्ये अमेरिकेतील हवाईमध्ये ही घटना घडली होती.(फोटो: Oddee.com)
1963 मधील रॉडने फॉक्सवरील हल्ला 1963 मधी ऑस्ट्रेलियातील एका स्पीयरफिशिंग स्पर्धेवेळी रॉडने फॉक्सवर शार्कने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामध्ये त्यांच्या शरीरावर पाचशे टाके घालावे लागले होते. छाती आणि फुफ्फुसांना मोठं नुकसान झालं होतं. शार्कच्या या हल्ल्यानंतर शार्कबद्दल त्यांचे विचार बदलले होते. (फोटो: Oddee.com)
1916 मधी अमेरिकेतल्या जर्सी समुद्र किनाऱ्यावर शार्कचा हल्ला 1916 मध्ये शार्कने केलेल्या या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामध्ये 5 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर जॉस नावाचा चित्रपट देखील आला होता. तज्ज्ञांच्या मतानुसार हे काम एका शार्क माशाचे नसून अनेक माशांनी हा हल्ला केला असावा. हा हल्ला इतका भयानक होता कि यामध्ये मृतांचे शरीराचे केवळ काही भाग शिल्ल्क राहिले होते. (फोटो: Oddee.com)
1959 मध्ये माणसाला शार्कने गिळले या व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्यानंतर 23 फूट लांबीच्या शार्कने त्याला गिळले होते. 1959 मध्ये घडलेल्या या घटनेत त्याचा मृतदेह सापडू शकला नाही. रॉबर्ट पॅम्परिन असे त्याचे नाव होते तो पाणबुडा होता. (फोटो: Oddee.com)
हवाईमधी 13 फूट लांब शार्कचा हल्ला 13 फूट लांबीच्या टायगर शार्कने ब्रॅक्स्टन नावाच्या व्यक्तीवर काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या पायाचा काही भाग शार्कने तोडला होता. या हल्ल्याची माहिती त्यांनी युट्युब आणि इंस्टाग्रामवर देखील शेअर केली होती. (फोटो: Oddee.com)
2020 मधी हार्पस्वेल इथं महिलेचा मृत्यू कधीही शार्कचा हल्ला न होणाऱ्या प्रदेशात या महिलेचा शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात या भागात हल्ला झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरले होते. (फोटो: Oddee.com)
1749मधी 2 वेळा वाचले ब्रुक्स वॉटसन लंडनचे माजी महापौर ब्रुक्स वॉटसन हे 2 वेळा शार्कच्या हल्ल्यातून वाचले होते. एका हल्ल्यात त्यांना आपला पाय गमवावा लागला होता. (फोटो: Oddee.com)
1952 मध्ये बॅरी विल्सनचा मृत्यू 1952 मध्ये समुद्रामधील शार्क माशाने या 17 वर्षीय मुलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात समुद्रकिनारी आणेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 1952 मध्ये या बॅरी विल्सनचा मृत्यू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. (फोटो: Oddee.com)
कॅलिफोर्नियामध्ये ओमर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील व्यक्तीचा शार्कच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. डायव्हिंगदरम्यान त्याने उडी मारली असता 16 फूट लांब शार्कने त्याच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यामधी जास्त रक्त गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. (फोटो: Oddee.com)