JOIN US
मराठी बातम्या / विदेश / शेजारच्या दाम्पत्यावर लक्ष ठेवण्यासाठी तरुणाचा विचित्र प्रकार; शेवटी घर सोडावं लागलं

शेजारच्या दाम्पत्यावर लक्ष ठेवण्यासाठी तरुणाचा विचित्र प्रकार; शेवटी घर सोडावं लागलं

आधी हे प्रकरण कोर्टात गेलं, मात्र कोर्टानेही साथ न दिल्यानं शेवटी दाम्पत्याला घर सोडावं लागलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : जर तुम्हाला कळालं की, बेडरूममध्ये झोपताना किंवा वॉशरूममध्ये आंघोळ करताना सातत्याने तुम्हाला कोणीतरी पाहत आहे. तर तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच अशा अवस्थेत जगणं अवघड होईल. असच काहीस लंडनमधील एका दाम्पत्यासोबत घडलं आहे. रोज़ी आणि क्रिस्टोफर (Rosie and Christopher) नावाच्या या दाम्पत्याच्या अगदी समोरच्या घराच्या खिडकीतून त्यांना दिवस-रात्री कोणीतरी पाहत होतं. या दाम्पत्याच्या शेजारी राहणारा कुक नावाच्या व्यक्तीने त्यांचं आयुष्य कठीण करून ठेवलं होतं. लंडनमधील रिचमंड पार्कमध्ये (London’s Richmond Park) राहणाऱ्या या दाम्पत्याच्या घरात राहणाऱ्या या दाम्पत्याच्या घराची पोजिशन अशी काही आहे, त्यांच्या शेजारीच्यांच घर काहीसं उंचावर आहे. कुकने आपल्या खिडकीत एक पुतळा ठेवला आहे. रोजी आणि क्रिस्टोफरला नेहमी असं वाटायचं की, त्यांना कोणीतरी पाहत आहे. दाम्पत्याला कपडे बदलण्यासाठीही बुककेसच्या मागे लपावं लागत होतं. (Had to hide behind bookcase to change dress). कुकच्या घरातून या दाम्पत्याच्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ दिसतो. याशिवाय तो खिडकी नेहमी उघडी ठेवतो. कुकने पुतळ्याच्या डोक्यावर ब्राऊन रंगाचा विग लावला होता. म्हणजे सतत कोणतरी पाहत असल्याचा भास होत राहील. हे ही वाचा- बाबा लगीन! 2 वर्षे वाट पाहिली आता नाही; एकाच वर्षात 26 लाख लग्न दाम्पत्य अनेकदा घरात अंधार करून बसत. हे प्रकरण शेवटी दाम्पत्याने उच्च न्यायालयात नेलं. मात्र कोर्टाने कुकला आरोपी मानलं नाही, कोर्टाने सांगितलं की, कुकने घराच्या प्लानिंग लेव्हरवर कोणतीही चूक केलेली नाही. केस हरल्यानंतर दाम्पत्य अधिक त्रस्त झाले. (Privacy breach by neighbor) त्यांच्या प्राव्हसीवर गदा येत असल्यामुळे शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय उरला होता. ज्या घरात ते गेल्या 27 वर्षांपासून राहत होते, ते तर त्यांना सोडावं लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या