पाकिस्तान, 11 फेब्रुवारी : पाकिस्तनाची (Pakistan News) सत्ताधारी पार्टी पीटीआयचे खासदार आमिर लियाकत हुसैन यांचं तिसरं लग्न पाकिस्तानात चर्चेचा विषय ठरला आहे. यादरम्यान त्यांच्या लग्नावर मुलगी दुआ आमिर याची प्रतिक्रियाही समोर आली आहे. लोक तिच्या 49 वर्षीय वडिलांनी 18 वर्षांच्या मुलीसोबत लग्न करण्याबद्दल कमेंट करीत आहे. यावरुन शेवटी दुआने लग्नाबाबत एक पोस्ट केली आहे. दुआ आमिराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत लिहिलं की, लोकांनी आपल्या कुटुंबावरुन कमेंट करणं बंद करा. हे अकाऊंट माझ्या कामासाठी आहे. जर तुम्ही याचा सन्मान करू शकत नाही तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता. दुआ पुढे लिहिते की, मी माझ्या वैयक्तित गोष्टीबाबत कोणत्याही कमेंटवर प्रतिक्रिया देणार नाही.
दुआच्या वडिलांनी केलं तिसरं लग्न… दुआच्या वडिलांनी 18 वर्षीय तरुणी सईदा दानिया शाह हिच्यासोबत लग्न केलं आहे. बुधवारी हे लग्न पार पडलं. बुधवारीच त्यांनी दुसरी पत्नी पाकिस्तानी अभिनेत्री टूबा आमिरने तलाकबद्दल माहिती दिली आणि त्याच दिवशी आमिरने तिसरं लग्न केलं. त्यांच्यामध्ये आणि तिसऱ्या पत्नीमधील वयाच्या अंतरामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
लग्नानंतर दोघांनी एकत्रित पाकिस्तानी पॉकास्टर नादिर अलीला एक मुलाखत दिली. ज्यात त्यांनी एकमेकांना हात हातात धरला आहे.