JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जगातील शेवटच्या पांढऱ्या एकशिंगी गेंड्याचा मृत्यू

जगातील शेवटच्या पांढऱ्या एकशिंगी गेंड्याचा मृत्यू

जगातील शेवटच्या पांढऱ्या एकशिंगी नर गेंड्याचा केनयात मृत्यू झालाय. सुदान नावाचा हा पांढरा गेंडा जगातला एकमेव पांढरा गेंडा होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

21 मार्च : जगातील शेवटच्या पांढऱ्या एकशिंगी नर गेंड्याचा केनयात मृत्यू झालाय. सुदान नावाचा हा पांढरा गेंडा जगातला एकमेव पांढरा गेंडा होता. सुदानचं वय 45 वर्ष होतं. आता त्याच्यानंतर केवळ त्याची मुलगी आणि नात हे दोनच पांढऱ्या गेंड्याचे वंशज जगात शिल्लक आहेत. ओल पेजेटा कन्झर्व्हेटरीत सुदान रहात होता. सुदान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. त्यामुळे तो अतिशय अशक्त झाला होता. त्यामुळेच सुदान गेंड्याच्या शुक्राणूंचं जतन करण्यात आलं होतं. या शुक्राणूंच्या मदतीनं जगाला पुन्हा एकदा नर पांढरा गेंडा पाहायला मिळू शकतो. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिका खंडात जवळपास 5 लाख पांढरे गेंडे होते. मात्र शिकारीच्या वाढत्या घटना आणि पांढऱ्या गेंड्यांच्या संवर्धनासाठी करण्यात आलेले अपुरे प्रयत्न यामुळे पांढरा नर गेंडा आता नामशेष झालाय. सध्या जगात फक्त दोन पांढऱ्या मादी गेंडा आहेत. सुदान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. त्यामुळे तो अतिशय अशक्त झाला. त्यामुळेच सुदान गेंड्याच्या शुक्राणूंचं जतन करण्यात आलंय. या शुक्राणूंच्या मदतीनं जगाला पुन्हा एकदा नर पांढरा गेंडा पाहायला मिळू शकतो. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिका खंडात जवळपास 5 लाख पांढरे गेंडे होते. मात्र शिकारीच्या वाढत्या घटना आणि पांढऱ्या गेंड्यांच्या संवर्धनासाठी करण्यात आलेले अपुरे प्रयत्न यामुळे नर पांढरा गेंडा आता नामशेष झालाय.  ट्विटरवरुनही सुदानला श्रद्धांजली वहाण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या