JOIN US
मराठी बातम्या / विदेश / सातव्या मजल्याच्या बाल्कनीत रांगेत उभं राहून अख्ख्या कुटुंबाने मारली उडी, हादरवणारी घटना

सातव्या मजल्याच्या बाल्कनीत रांगेत उभं राहून अख्ख्या कुटुंबाने मारली उडी, हादरवणारी घटना

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 मार्च :  जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी स्वित्झर्लंड (Switzerland) एक आहे. येथील मॉन्ट्रो भागात गुरुवारी एक खळबळजनक घटना घडली. येथील एका फ्रान्सीसी कुटुंवातील 5 सदस्यांनी सातव्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. यात चार जणांचा मृत्यू झाला असून एका सदस्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. मात्र अद्याप यामागील कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत एक पुरुष (40), त्याची पत्‍नी (41) आणि त्याच्या जुळ्या बहिणी, मुलगी (8) यांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा (15) जीवंत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हे कुटुंब एका उच्चभ्रू भागात राहत होतं. स्थानिकांनी सांगितलं की, गुरुवारच्या सकाळी या कुटुंबाकडे दोन अधिकारी आले होते, आणि यानंतर कुटुंबाने बाल्कनीतून उडी मारली. पोलिसांनी सांगितलं की, मुलाला सोडून सर्वांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, दोन्ही अधिकारी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करू शकत नव्हते, मात्र नेमकं त्याच वेळेस कुटुंबाने बाल्कनीतून उडी मारली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. हे ही वाचा- धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत…; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद मुलगा शाळेत जात नसल्याने अधिकारी भेटायला गेले होते… पोलिसांनी सांगितलं की, दोन अधिकारी भेटण्यासाठी अपार्टमेंटपर्यंत पोहोचले होते. मात्र ही भेट त्यांच्या मुलाच्या होम स्कूलिंगबद्दल होती. त्यांनी जेव्हा दार ठोठावलं , तर आतून कोण असल्याचं विचारण्यात आलं. यावर अधिकाऱ्यांनी आपला परिचय दिला. यानंतर मात्र आतून काहीच आवाज आला नाही आणि अधिकारी परतले. ते घरात गेलेच नाहीत. यादरम्यान पोलिसांना काही जणं इमारतीवरुन खाली पडल्याची सूचना मिळाली. शेजाऱ्यांनी सांगितलं की, त्याचे वडील घरूनच काम करीत असे. आई डेंटिस्ट तर त्यांच्या जुळ्या बहिणी नेत्र रोग विषेशज्ञ होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या