इस्लामाबाद, 3 जुलै : पाकिस्तानी (Pakistan News) मीडियाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तंत्र-मंत्र जाणणारी पत्नी बुशरा बीवी यांचा एक खळबळजनक ऑडिओ लीक केला आहे. ज्या त्या विरोधकांना संपवण्याचा प्लान सांगते. बुशरा बीबी यांचा ऑडिओ लीक झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लोक इम्रान खानसमोर अनेक सवाल उपस्थित करीत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला ऑडिओ इम्रान खान यांच्या पत्नीचा असल्याचा दावा केला जात आहे. ज्या बुशरा बीबी इम्रान खान यांच्या पार्टीच्या सोशल मीडिया विंगला निर्देश देताना दिसत आहे. इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील परेड ग्राऊंडवर महागाई, राजकीय अस्थिरता, वीज संकट आणि इंधनाच्या किमतीत वाढ या विरोधात रॅलीला संबोधित केले होते. त्यादरम्यान त्यांच्या ‘तंत्रित बीवी’चा ऑडिओ लीक झाला होता.
विरोधकांना देशद्रोहाशी जोडा इम्रान खान यांची पत्नी म्हणाल्या की, ‘अलीम खान आणि इतर त्यांच्या योजनेनुसार बोलत राहतील. तुम्ही त्यांना देशद्रोहाशी जोडले पाहिजे. तुम्ही सोशल मीडियावर धमकीच्या पत्राचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे आणि आम्हाला माहिती आहे की हे पत्र विश्वासार्ह आहे. ऑडिओ क्लिपमध्ये, बुशराने कथितपणे पीटीआयच्या सोशल मीडिया प्रमुखाला हे कथन सेट करण्याचे आदेश दिले की पीटीआय सोडणारे हे स्वत:चा बचाव करण्यासाठी परदेशी कटकारस्थानांमध्ये सामील झाले होते.