वेटिकन सिटी, 6 फेब्रुवारी : ब्राझीलच्या (Brazil News) एका मॉडेलला वेटिकन सिटीमध्ये छोटे कपडे घातल्यामुळे बाहेर काढण्यात आलं आहे. ज्यानंतर मॉडेलने सोशल मीडियावर आपलं दु:ख व्यक्त केलं. 34 वर्षीय जूजू विएराने (Juju Vieira) सांगितलं की, ती वेटिकन सिटी फिरण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिला शहर सोडण्यास सांगण्यात आलं आहे. यामागील कारण सांगताना मॉडेल म्हणाली की, तिने वेटिकनच्या ड्रेस कोडचं उल्लंघन केलं होतं. ज्यामुळे तिला शहर सोडण्यास सांगण्यात आलं. आदेशामध्ये म्हणण्यात आलं की, तिने गुडघ्याच्या वर ग्रे रंगाचा ड्रेस घातला होता. मॉडेल म्हणाली, अपमान झाला… मॉडल जूजू विएराने (Juju Vieira) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने याबाबत माहिती दिली. सोबतच सांगितलं की, तिचा अपमान झाला आहे. तिचा हा व्हिडीओ आतापर्यंत 26,400 फॉलोअर्सनी पाहिला आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेक लोकांनी सांगितलं की, छोटे कपडे घातल्यामुळे तिला वेटिकन सिटीतून बाहेर काढण्यात आलं. हे ही वाचा- ‘कंदिला’मध्ये बसून करावं लागतं जेवण, वाचा काय आहे नेमका या हॉटेलमधील प्रकार? मॉडेलने सांगितलं की, ड्रेस कोड नव्हता माहीत.. इंन्स्टाग्रामवर मॉडेलने दावा केला आहे की, तिने व्यवस्थित कपडे घातले नव्हते. त्यामुळे तिला बाहेर जायला सांगण्यात आलं. यासोबतच ती म्हणाली की, वेटिकनमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी एक कडक ड्रेस कोड आहे. ज्यात खांदे आणि गुडघे झाकणं गरजेचं आहे. मात्र या मॉडेलने लहान कपडे घातले होते. यासोबतच मॉडेलने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, येथील ड्रेस कोडबद्दल तिला माहिती नव्हतं आणि तिने काहीही विचार न करता कपडे घातले होते.