JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Russia-Ukraine War: रशियाच्या क्रूरतेचा कळस; किवच्या रस्त्यावर मृतदेहांचा खच, मारियुपोलमध्ये 21 हून अधिक मृत्यू

Russia-Ukraine War: रशियाच्या क्रूरतेचा कळस; किवच्या रस्त्यावर मृतदेहांचा खच, मारियुपोलमध्ये 21 हून अधिक मृत्यू

Russia-Ukraine War Updates: मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सापडलेल्या मृतदेहांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ल्विव्ह, 16 एप्रिल: रशियन (Russian) सैन्याच्या माघारीनंतर कीव परिसरात (Kyiv area) 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. प्रादेशिक पोलीस प्रमुखांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कीवमधील प्रादेशिक पोलीस दलाचे प्रमुख एंड्रीय नेबितोव यांनी सांगितले की, मृतदेह एकतर रस्त्यावर उघडे ठेवण्यात आले किंवा तात्पुरते दफन करण्यात आले. या आकडेवारीवरून 95 टक्के लोकांना गोळ्या लागल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एंड्रीय म्हणाले, आम्ही समजतो की रशियन ताब्यादरम्यान लोकांची रस्त्यावर हत्या करण्यात आली होती. मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सापडलेल्या मृतदेहांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दररोज ढिगाऱ्याखाली आणि सामूहिक कबरींमध्ये मृतदेह सापडत आहेत. बुचामध्ये लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. जिथे 350 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. तसंच एंड्रीय यांनी सांगितलं की, रशियन सैन्य अशा लोकांचा शोध घेत आहे जे युक्रेनियन समर्थक विचार व्यक्त करतात. रशियन सैनिकांनी मारियुपोलमध्ये मृतदेह दफन करण्यास केला विरोध दरम्यान मारियुपोल सिटी कौन्सिलने शुक्रवारी सांगितलं की, रशियन सैनिक पूर्वी निवासी संकुलात पुरलेले मृतदेह बाहेर काढत होते आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मॉस्कोच्या सैन्याने मारले गेलेल्यांना दफन करण्याची परवानगी देत ​​​​नाहीत. टेलिग्रामवर प्रसिद्ध झालेल्या मेसेनुसार, मारियुपोलच्या रहिवाशांना त्यांचे मृत नातेवाईक किंवा मित्र चितेकडे सोपवण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक कंपाउंडमध्ये एक रक्षक तैनात करण्यात आला आहे. मृतदेह का बाहेर काढले जात आहेत आणि ते कुठे नेले जातील याची माहिती नाही. मारियुपोलमध्ये सुमारे 21,000 लोकांचा मृत्यू मारियुपोलचे महापौर वादिम बायचेंको यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, मारियुपोलमध्ये कमीतकमी 21,000 लोक मरण पावले आहेत आणि बरेच मृतदेह रस्त्यावर पडले आहेत. त्यांनी असा दावा केला की, रशियन सैन्याने अंत्यसंस्कारासाठी गतिशील उपकरणे तैनात केली आहेत. नरसंहाराचा पुरावा लपवण्यासाठी पीडितांच्या मृतदेहांची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली आहे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेला रशियन सैन्याने केलेल्या भीषण घटनाचा पुरावा प्रदान करणं शक्य झालं नाही. त्याच वेळी, रशियन सैनिकांनी खार्किव या ईशान्येकडील शहराजवळील बोरोवाया या युक्रेनियन गावात नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार केला, ज्यात सात जण ठार आणि 27 जखमी झाले. प्रादेशिक अभियोक्ता कार्यालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी युक्रेनच्या सस्पलाइन न्यूज वेबसाइटला ही माहिती दिली. ते म्हणाले की, युक्रेनियन कायदा अंमलबजावणी एजन्सी हल्ल्याची परिस्थिती निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दाव्यांची पडताळणी करता आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या