JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे सॅटेलाइट Photos, काही अंतरावर 150 रशियन हेलिकॉप्टर

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे सॅटेलाइट Photos, काही अंतरावर 150 रशियन हेलिकॉप्टर

Russia Ukraine War:रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेल्या युद्धादरम्यान काही सॅटेलाइट फोटो (Satellite images) समोर आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कीव, 26 फेब्रुवारी: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेल्या युद्धादरम्यान काही सॅटेलाइट फोटो (Satellite images) समोर आले आहेत. ज्यावरून असं समजलं आहे की किमान 150 रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopters) आणि सर्व सैनिक युक्रेन सीमेपासून काही अंतरावरच तैनात आहेत. मॅक्सर टेक्नॉलॉजीनं (Maxer Technology) हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. असं सांगण्यात आले आहे की, त्यांची उपस्थिती दक्षिणी बोलारुसमध्ये आहे. फोटोंमध्ये बेलारूसी शहर चोजनिकीजवळ मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत, 90 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर रस्त्यावर उभी होते. खासगी यूएस कंपनीच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी घेतलेल्या उपग्रह फोटोंमध्ये दक्षिण बेलारूसमध्ये अनेक मोठ्या भूदल तैनात आणि सुमारे 150 ट्रासपोर्ट हेलिकॉप्टर युक्रेनियन सीमेपासून सुमारे 20 मैलांवर दिसले. त्याचवेळी, बेलारूसी शहर चोजनिकीजवळ रस्त्यावर उभी असलेली 90 हून अधिक हेलिकॉप्टर, त्यांची तैनाती पाच मैलांच्या परिसरात पसरलेली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसत नाही. यापूर्वीही मॅक्सार टेक्नॉलॉजीनं उपग्रह फोटो प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये युक्रेनच्या सीमेजवळ लाखो रशियन सैनिकांची तैनात असल्याचं दिसून आलं आहे. मॅक्सर वेळोवेळी असे फोटो प्रसिद्ध करत आहे.

कीवच्या आकाशात मिसाईलचा थरार, रशियाच्या हल्ल्याचा ताजा Live Video

युक्रेनची राजधानी कीवमध्ये सध्या जोरदार गोळीबार सुरू आहे. कीवच्या आकाशात लढाऊ विमानाचा आवाज ऐकू येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रात्रीचा आहे. रस्त्यावर शांतता आहे. मात्र गोळ्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे.

संबंधित बातम्या

लोक आपापल्या घरात लपून बसले आहेत, काही लोकांनी घरे सोडली आहेत आणि संधी मिळताच सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत. कीवजवळ रशियन विमान पाडलं युक्रेनच्या लष्करानं काल रात्री उशिरा राजधानी कीवजवळ रशियन विमान पाडल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप याला स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही. Il-76 विमाने सामान्यतः जड वाहतूक आणि पॅराट्रूपर ऑपरेशन्ससाठी चालविली जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या