(Photo-AP)
कीव, 24 एप्रिल: रशियन सैन्यानं (Russian forces) शनिवारी ओडेसा (Odessa) लष्करी तळावर हल्ला करून युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटनने युक्रेनला (Ukraine) मदत केलेल्या शस्त्रास्त्रांचा मोठा साठा नष्ट केला. क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात अनेक चिलखती वाहनांसह 30 हून अधिक वाहनंही नष्ट झाली. या हल्ल्यात युक्रेनचे 200 सैनिक (Ukrainian soldiers) मारले गेल्याचा दावाही रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे. खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. रशियन विमानांनी लुहान्स्कवरही बॉम्बहल्ला केला आहे. मस्कावा येथे तैनात असलेल्या एका युद्धनौकेवरील सैनिकाचा मृत्यू, 27 बेपत्ता काळ्या समुद्रात गेल्या आठवड्यात बुडालेल्या मस्कावा या युद्धनौकेवरील एका सैनिकाचा मृत्यू झाला असून इतर 27 जण बेपत्ता असल्याची कबुली रशियन संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. युद्धनौकेला आग लागल्यानंतर 396 खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने मुस्कावा बुडालं होतं. तर रशियाने युद्धनौकेला आग लागल्याचा दावा केला आहे. पुतिन आणि झेलेन्स्की यांची भेट घेणार अँटोनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की ते पुढील आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही नेत्यांसोबत या चर्चेदरम्यान युक्रेनमधील जीवित आणि मालमत्तेचे रक्षण, सामान्य लोकांच्या समस्या संपवणे आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याबाबत चर्चा केली जाईल. संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ते अरी कानेको यांनी सांगितले की, गुटेरेस 26 एप्रिल रोजी मॉस्कोला भेट देतील. रशियाच्या सहकार्यावर अमेरिकेचा चीनला इशारा रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात मॉस्कोला मदत केल्याबद्दल अमेरिकेने चीनला कडक इशारा दिला आहे. ब्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकेच्या उप परराष्ट्र मंत्री वेंडी शर्मन यांनी चीनशी चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, चीन युद्धात रशियाला सतत साथ देत आहे. त्याचवेळी चीन आंतरराष्ट्रीय मंचावर रशियाचा बचाव करत असून युद्ध सुरू ठेवण्यासही मदत करत आहे.