युक्रेन, 25 फेब्रुवारी: रशिया (Russia) आता युक्रेनवर (Ukraine) कशा प्रकारे हल्ला करत आहे, याचे धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. युक्रेनची सामान्य जनता या युद्धाची कशी शिकार होत आहे. याच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका भितीदायक व्हिडिओवरून त्याचं चित्र स्पष्ट होत आहे. युक्रेनच्या रस्त्यावरून एक सायकलस्वार जात आहे. त्याच्या मनात युद्धाची भीती नक्कीच आहे, पण पुढच्याच क्षणी त्याचे काय होणार आहे याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. निर्जन रस्ता आहे, मग अचानक हवाई हल्ला होतो. मोठा आवाज झाल्यानं आगीचे दृश्य सर्वत्र पसरते आणि क्षणार्धात सर्व काही नष्ट झालं. हा व्हिडिओ पहा.
युक्रेन सध्या संकटाचा सामना करत आहे. हवाई, जल आणि जमीन हल्ल्यांचा सामना करत असलेले युक्रेन आता आणखी संकटात सापडलं आहे. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युक्रेनमधील 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्याचवेळी रशियाने युक्रेनच्या जमिनीवरही हल्ला केला आहे. रशियन सैन्यानं चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प घेतला ताब्यात रशियन सैन्यानं गुरुवारी उत्तर युक्रेनमधील पिपरियात शहराजवळील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला. रशियन संसदेनं ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, चेर्नोबिल रशियन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. चेर्नोबिल अणु प्रकल्पावर ताबा मिळवणं म्हणजे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे. बायडेन यांनी रशियावर लादले कठोर आर्थिक निर्बंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध निवडले. त्याने रशियाविरूद्ध कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले, मात्र रशियन सैन्याविरूद्ध युद्ध करण्यासाठी युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्यास स्पष्टपणे नकार दिला. पुढे त्यांनी म्हटलं की, रशियाच्या विरोधात जग एकवटलं आहे.