कीव, 26 फेब्रुवारी: युक्रेनमध्ये (Ukraine) युद्धाची तीव्रता आणखीन वाढली आहे. कीव विमानतळाजवळ रशियानं मोठा स्फोट घडवून आणला आहे. ज्यात अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. दरम्यान युक्रेनच्या लष्करानं दावा केला आहे की, युक्रेन सैन्यानं 14 रशियन विमानं, 8 हेलिकॉप्टर, 102 टँक, 536 चिलखती वाहने, 15 तोफखाने नष्ट केली आहेत. तसंच 3,500 सैनिक मारले असल्याचंही युक्रेननं म्हटलं आहे. कीवजवळ रशियन विमान पाडलं युक्रेनच्या लष्करानं काल रात्री उशिरा राजधानी कीवजवळ रशियन विमान पाडल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप याला स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही. Il-76 विमाने सामान्यतः जड वाहतूक आणि पॅराट्रूपर ऑपरेशन्ससाठी चालविली जातात.
सकाळी युक्रेननं 60 रशियन सैनिक मारल्याचा दावा रशियन लष्करी विमान पाडल्यानंतर युक्रेननं आता आपला दुसरा दावा केला आहे. युक्रेनियन सैन्यानं म्हटलं आहे की, हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारी रोजी कीवमध्ये 60 रशियन सैनिक मारले गेले. त्याच वेळी, रशियन सैनिक कीवच्या दक्षिणेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या Vasylkiv मध्ये घुसले होते. युक्रेननं या सैनिकांना तोडफोड करणारे घटक म्हटलं आहे. तसंच वासिल्किवमध्ये रशियन सैनिकांशी चकमक झाल्याचं सांगितलं. युक्रेनचा दावा आहे की, रशियन पॅराट्रूपर्सने 37 हजार लोकसंख्येच्या Vasylkiv शहरावर हल्ला केला. यामध्ये युक्रेनच्या लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कीवमध्ये सर्वत्र धोकादायक स्फोट CNN च्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये गेल्या काही तासांपासून शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेला जोरदार स्फोट झाल्याचं वृत्त आहे. रशियाचा युक्रेनवर हल्ला गुरुवारपासून सुरू झाला आणि झपाट्यानं देशभर पसरला. रशियन सैन्यानं जमीन, समुद्र आणि हवा अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला आहे.