कीव, 05 मार्च: रशियन सैन्यानं (Russian forces) शनिवारी युक्रेनच्या (Ukraine) बंडखोर झोन डोनेत्स्कमध्ये मोठा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व युक्रेनवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. आयदर बटालियनच्या पोस्टवर हा हल्ला करण्यात आला आहे. ड्रोन हल्ल्यात (drone attack) आयदर बटालियनची चौकी उद्ध्वस्त झाली आहे. ड्रोन हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ
हवाई हल्ल्याचा रेड अलर्ट जारी युक्रेनची राजधानी कीव आणि चेर्निहाइव्हमध्ये हवाई हल्ल्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. युक्रेनच्या सुमी शहरातील रस्त्यांवर युद्ध सुरू झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक रहिवाशांना घरी राहण्यास किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 12 लाख लोकांनी युक्रेन सोडलं: UNHCR संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठी उच्चायुक्त (UNHCR) च्या अहवालानुसार, 24 फेब्रुवारी रोजी रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर 3 मार्चपर्यंत 12 लाखांहून अधिक निर्वासितांनी युक्रेन सोडलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार? रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या असून, त्याचा परिणाम जगातील विविध देशांतील सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. या वस्तूंच्या किमती निश्चित करण्यात रशिया आणि युक्रेनची महत्त्वाची भूमिका आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाई वाढेल जगातील कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत महागाईचा मुख्य चालक इंधनाची किंमत आहे, कारण यामुळे वाहतूक-मालवाहतूक खर्च वाढतो. परिणामी अनेक वस्तू महाग होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीवरून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर (Crude Oil Price) मोठा परिणाम झाला आहे. 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल 100 डॉलरचा चा टप्पा ओलांडला आहे. 23 फेब्रुवारीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत 19% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती निश्चित करण्यात रशियाची महत्त्वाची भूमिका आहे, ते दरवर्षी 65 लाख बॅरल तेल निर्यात करते.