JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / कोरोनाने बदललं हज यात्रेचं रुप, सॅनिटायझेशनसाठी जागोजागी रोबो तैनात, पाहा Photos

कोरोनाने बदललं हज यात्रेचं रुप, सॅनिटायझेशनसाठी जागोजागी रोबो तैनात, पाहा Photos

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या हज यात्रेसाठी यंदा वेगळी तयारी करण्यात आली आहे. यंदा केवळ 60 हजार यात्रेकरूंनाच परवानगी देण्यात आली असून जागोजागी सॅनिटायझेशनसाठी रोबो तैनात करण्यात आले आहेत.

0108

कोरोना संकटाच्या सावटाखाली होणाऱ्या हज यात्रेला 17 जुलैपासून सुरुवात झाली आहे. सौदी अरेबियानं यंदा केवळ 60 हजार नागरिकांंना हज यात्रेला येण्याची परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, केवळ त्यांनाच या यात्रेत सहभागी होता येणार आहे.

जाहिरात
0208

नेहमी होणाऱ्या यात्रेपेक्षा यंदाजी हज यात्रा काहीशी वेगळी आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनिटायझेशन बंधनकारक असणार आहे.

जाहिरात
0308

यंदा लॉटरी पद्धतीनं हज यात्रेकरूंची निवड करण्यात आली. त्यासाठी आलेल्या 5.58 लाख अर्जांपैकी केवळ 60 हजारांची निवड करण्यात आली.

जाहिरात
0408

या यात्रेत ठराविक अंतरावर सॅनिटायझेशनसाठी रोबो उभे करण्यात आले आहेत. त्याशिवाय स्मार्ट ब्रेसलेटच्या माध्यमातून यात्रेकरूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

जाहिरात
0508

यंदा केवळ 18 ते 65 या वयोगटातील नागरिकांनाच या यात्रेत सहभागी करून घेण्यात आलं आहे. कुठलाही आजार नसलेल्या व्यक्तींचीच यासाठी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
0608

वीस यात्रेकरूंचा एक, याप्रमाणे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटाचा एक नेता आहे. गर्दी होऊ नये आणि नागरिकांनी ठराविक अंतर राखून पुढे जावं, हा यामागचा उद्देश आहे.

जाहिरात
0708

मुस्लिम समाजात हज यात्रा ही सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. अनेकजण ही यात्रा म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात.

जाहिरात
0808

गेल्या वर्षी केवळ 10 हजार नागरिकांनीच हज यात्रेत सहभाग घेतला होता. आतापर्यंत सौदी अरेबियात 5 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 8000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या