08 आॅक्टोबर : रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आलाय. त्यांचा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कारांच्या यादीत समानेश केला गेलाय. क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स या संस्थेने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केलीय त्यात रघुराम राजन यांचं नाव आहे. क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था असून त्यांनी जगभरातल्या 6 अर्थतज्ज्ञांची यासाठी निवड केलीय. कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या 40 व्या वर्षी प्रमुख झाले. राजन यांनी २००५ मध्ये शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली.