JOIN US
मराठी बातम्या / विदेश / डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; पानांच्या दुकांनासह नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; पानांच्या दुकांनासह नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

तीन तासांच्या दौऱ्यात ट्रम्प यांना अहमदाबाद स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 17 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर येणार आहेत. गुजरातच्या अहमदाबादमध्ये यासाठी विशेष तयारी सुरू झाली आहे. तीन तासांच्या या दौऱ्यात ट्रम्प यांना अहमदाबाद स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील झोपडपट्टी लपविण्यासाठी येथे भिंत उभी करण्याचा मुद्दा समोर आला होत्या. त्यापार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांच्या गाड्यांचा ताफ्याच्या वाटेत नीलगाय, कुत्रे येऊ नयेत यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे तर पानांच्या दुकानांनाही टाळे लावण्यात आले असून जेणेकरुन लोक भितींवर थुंकणार नाहीत. 2015 मध्ये झाला होता अपघात 2015 या वर्षी अमेरिकेचे मंत्री जॉन कॅरी ‘वायब्रंट गुजरात’ या कार्यक्रमासाठी आले होते. तेथून एअरपोर्टच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीसमोर एक कुत्रा आला होता. हा कुत्रा गाडीखाली आला होता. यंदा अशी परिस्थिती ओढावू नये याची काळजी घेतली जात आहे. पशुपालन विभागाने यासाठी सोमवारी एक विशेष बैठक बोलावली आहे. यामध्ये कुत्र्यांना VVIP रस्त्यावरुन कसं लांब ठेवायचं याचं प्लानिंग करण्यात येणार आहे. एअरपोर्टपासून स्टेडिअमपर्यंतचा एक किमीच्या रस्तांवर नीलगाय यांची संख्या जास्त आहे. यासाठी वनविभागाशी चर्चा करण्य़ात य़ेणार आहे. पानांच्या दुकानांना टाळं देशातील इतर शहरांप्रमाणे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात पान खाल्लं जातं. परिणामी येथील रस्त्यांवर पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. मात्र ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असलेला रस्ता स्वच्छ ठेवण्यासाठी या रस्त्यावरील पानांची दुकाने बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी एअरपोर्ट सर्कल येथील पानांच्या तीन दुकानांना टाळे लावले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या