पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Rome मधील ऐतिहासिक Trevi Fountain ला भेट दिली. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या या फाउंटनवर जी-20 राष्ट्रांचे प्रमुख दाखल झाले आणि धमाल गप्पांना रंग चढला. ऐतिहासिक शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱा हा फाउंटन 26.3 मीटर उंच आणि 49.15 मीटर रुंद आहे.
रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-20 राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत ऐतिहासिक ट्रेवी फाउंटनला भेट दिली. इटलीतील हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण समजलं जातं आणि पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीला उतरतं.
या फाउंटननं अनेक चित्रपट निर्मात्यांना आजवर आकर्षित केलं आहे. एक प्रतिक म्हणून हे ठिकाण अनेक चित्रपटांत झळकलं आहे.
जी-20 समिटच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जागतिक नेत्यांनी या ठिकाणाला भेट देऊन केली. जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक मानलं जातं.