देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला.
इस्लामाबाद 22 एप्रिल: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा रिझल्ट सरकारने जाहीर केला आहे. इम्रान खान यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री झफर मिर्झा यांनी दिली. पाकिस्तानामधली मोठी स्वयंसेवी संघटना असलेल्या इधी फाऊंडेशनच्या प्रमुखांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती. नंतर त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. नंतर इम्रान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हापासून ते आयसोलेशनमध्येच राहत होते. इधी फाऊंडेशनचे प्रमुख फैसल इधी यांनी इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान रिलीफ फंडासाठी चेक दिला होता. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर त्यांनाही होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. पंतप्रधान कार्यालयाकडूनच इम्रान खान आणि इधी यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. यामध्ये इम्रान यांनी मास्क किंवा ग्लोव्ह्जचा वापर केलेला दिसत नाही आहे. यामुळेच डॉक्टरांनी कोणताही धोका न घेता इम्रान खानची चाचणी करण्याचे ठरविले. या दोघांमधील बैठक सुमारे 7 मिनिटे चालली. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान इम्रान खान सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी काही दिवस कोणत्याही व्यक्तीची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे. वाचा- ‘आम्हाला वाचवा नाहीतर…’, पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची एकूण संख्या 10 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात या विषाणूचा सर्वाधिक परिणाम होत आहे. फैसल इधी यांची प्रकृती स्थिर पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर फैसल यांना बरे वाटले नसल्याचे माध्यमात दिलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यांचा मुलगा साद इधी म्हणाले, इस्लामाबादमध्ये पंतप्रधानांना भेटल्यानंतर घरी परत आल्यावर काही लक्षणे दिसू लागली. मात्र पुढील तीन ते चार दिवसांनंतर ही लक्षणे कमी होऊ लागली. चीनमध्ये 2 महिन्यांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत, बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोना दरम्यान, कोरोना तपासणीसाठी एक नमुना पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज (मंगळवार) आला आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. त्याचे वडील फैसल इधी यांची प्रकृती ठीक असल्याचे साद यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही. तर ते घरात क्वारंटाइनमध्ये आहेत.