पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात

पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकूण 342 जागांसाठी 12 हजार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

08:54 (IST)

08:43 (IST)

08:42 (IST)

08:31 (IST)

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागा ३,४५९ उमेदवार लढवत असून चार प्रांतीय असेम्ब्लींच्या ५७७ सर्वसाधारण जागा ८,३९६ उमेदवार लढवत आहेत. देशात १०५.९६ दशलक्ष मतदारांची नोंद आहे. देशभर मतदानासाठी तीन लाख ७० हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच मतदानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले गेले आहे.

08:28 (IST)

पाकिस्तानच्या जन्मापासून नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्ता हस्तांतर होण्याची ही फक्त दुसरी वेळ असेल. या निवडणुकीत सर्वशक्तिमान लष्कर लबाडी करील, असे आरोप झाले असून कट्टर इस्लामी मोठ्या संख्येने सहभागी असल्याबद्दल काळजी व्यक्त झाली आहे.

08:27 (IST)

पाकिस्तानात बुधवारी नवा पंतप्रधान निवडण्यासाठी व एक नागरी सरकार दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे सोपवण्यासाठी मतदान होत आहे. देशात प्रथमच मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने लष्करी जवान तैनात केले गेले आहेत.

पाकिस्तान, 25 जुलै : पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकूण 342 जागांसाठी 12 हजार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभेसह 4 प्रांतातील विधानसभा निवडणुकाही उद्याच घेतल्या जाणार आहेत. विधानसभेसाठी 8 हजार 895 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज, इमरान खान यांची पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात खरी लढत आहे. उमेदवारांमध्ये कट्टर मौलवींचाही समावेश आहे.लोकसभेसह 4 प्रांतातील विधानसभा निवडणुकाही उद्याच घेतल्या जाणार आहेत. विधानसभेसाठी 8 हजार 895 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम संपली. प्रचारकाळात घडलेल्या काही हिंसक घटनांमुळे सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलीय.मराठा आरक्षण चिघळलं, मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबई बंद

पाकिस्तानात आज मतदानलोकसभा आणि विधानसभेचं मतदान एकत्र342 जागांसाठी 12 हजार उमेदवार रिंगणात

Trending Now