JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ‘भारतीय पाकिस्तानचे तीन तुकडे करतील,’ सत्ता गेल्यानंतर इम्रान खान यांना भीतीनं पछाडलं!

‘भारतीय पाकिस्तानचे तीन तुकडे करतील,’ सत्ता गेल्यानंतर इम्रान खान यांना भीतीनं पछाडलं!

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान (Imran Khan) यांना दोन महिन्यापूर्वी पायउतार व्हावं लागलं होतं. सत्ता गेल्याने निराश झालेले इम्रान खान यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान (Imran Khan) यांना दोन महिन्यापूर्वी पायउतार व्हावं लागलं होतं.  सत्ता गेल्याने निराश झालेले इम्रान खान सातत्याने अनेक विषयांवर त्यांच मत प्रदर्शित करत आहेत.  त्यांनी नुकतंच पाकिस्तानच्या लष्कराला (Pakistani Army) आवाहन करणारं एक वक्तव्य केलंय. ‘पाकिस्तानी लष्कराने सध्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप केला नाही, तर देशाचे तीन तुकडे होऊ शकतात,’ असं माजी पंतप्रधान इम्रान यांनी म्हटलंय. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळेच इम्रान यांना पंतप्रधानपद सोडावं लागल्याचीही चर्चा आहे. लष्कराने योग्य निर्णय न घेतल्यास पाकिस्तानचे तीन तुकडे होतील, असा इशारा इम्रान खान यांनी बुधवारी दिलाय. बोल न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं. टीव्ही 9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय म्हणाले इम्रान? इम्रान खान यांनी या मुलाखतीमध्ये , ‘लष्कराने योग्य निर्णय न घेतल्यास देश आत्महत्येच्या स्थितीत असेल.’ अशी भीती व्यक्त केलीय. त्यांनी यावेळी भारतावरही आरोप केलाय. ‘परदेशातील भारतीय थिंक टँक बलुचिस्तान वेगळं करण्याचा विचार करत आहेत. त्याच्याजवळ एक प्लॅन आहे, म्हणूनच मी दबाव टाकत आहे,’ असं इम्रान म्हणाले. ’ खरी समस्या पाकिस्तान देश आणि पाकिस्तानी लष्कराची आहे. लष्कराने योग्य निर्णय घेतला नाही, सर्वात आधी लष्कर उद्ध्वस्त होईल. हे तुम्हाला लेखी देतो की,  एकदा देश उद्ध्वस्त झाला की सगळं दिवाळखोरीत निघेल, त्यानंतर जग पाकिस्तानला अण्वस्त्राचा त्याग करायला सांगेल. युक्रेनवर 1990 च्या दशकात ही वेळ आली होती,’ असा दावा इशारा इम्रान खान यांनी केला. अमेरिकेच्या हॉस्पिटल कॅम्पसजवळ भीषण गोळीबार, हल्लेखोरासह 4 ठार; अनेक जखमी अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याचा कट पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना सत्तेत परतण्यास मदत केली नाही तर त्यांचाही नाश होईल. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत राहिल्यास आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असेल, असं भाकितही इम्रान खान यांनी केलं.  बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानला अण्वस्त्रं विकास कार्यक्रम थांबवायला सांगण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. इम्रान म्हणाले की, ज्या संस्था देशाचा पाया मजबूत करतात, त्याच देशाला कमकुवत करत आहेक. त्यांनी यावेळी शाहबाज शरीफ यांच्या सरकारवरही जोरदार टीका केली. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘हा इशारा देश म्हणून पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानच्या सैन्याबद्दल आहे. लष्कराने आता योग्य निर्णय घेतला नाही, तर आधी त्यांचा नाश होईल, असं मी तुम्हाला लेखी सांगत आहे. देश दिवाळखोरीकडे जात असल्याने आधी लष्कर नष्ट होईल. देश दिवाळखोरीत निघाला तर काय होईल? मी तुम्हाला क्रम सांगतो. शाहबाज शरीफ सत्तेत आल्यापासून पाकिस्तानी रुपया आणि शेअर बाजाराचे मूल्य घसरत आहे. महागाई वाढत आहे, पाकिस्तान दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. याचा अर्थ पाकिस्तान गरिबीकडे वाटचाल करत आहे. याचा सर्वांत जास्त परिणाम पाकिस्तानी लष्करावर होईल. लष्करावर परिणाम झाल्यास आपल्याला युक्रेनप्रमाणेच (Ukraine) अण्वस्त्रं सोडण्यास सांगितलं जाईल. पाकिस्तान या एकमेव मुस्लिम देशाकडं (Muslin Country) अण्वस्त्रं आहेत. त्यामुळे आपण हरलो तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील,’ असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या