JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Shocking! स्मशानातील एका सांगाड्यासह नाचताना दिसली नन; भयावह दृश्य पाहून नागरिक सुन्न

Shocking! स्मशानातील एका सांगाड्यासह नाचताना दिसली नन; भयावह दृश्य पाहून नागरिक सुन्न

ही महिला एका कुत्र्याच्या सांगाड्यासह खेळत होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 12 सप्टेंबर : विचार करून पाहा, कसंल भयंकर दृश्य असेल..जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृतदेहांमध्ये एका सांगाड्यासोबत खेळताना पाहिलं तर…भरदिवसात ही घटना घडली आहे. United Kingdom मधील Hull City मध्ये लोकांनी कब्रिस्तानजवळून जाणाऱ्या एका ननला सांगाड्यांसह खेळताना आणि नाचताना पाहिलं. (nun was seen dancing with the skeleton in the cemetery Citizens numb at the sight of the frightening scene) Hull Live मधील वृत्तानुसार, त्या भागातून जाणाऱ्या एका व्यक्तीने हे विचित्र असं दृश्य पाहिलं. आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. या फोटोमध्ये महिलेच्या हातात एक माणूस आणि कुत्र्याचा सांगाडा स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे हे दृश्य कोणा एका व्यक्तीने नाही तर तेथून जाणाऱ्या अनेकांनी पाहिलं आहे. हे ही वाचा- करीत नाही अंत्यसंस्कार; मृतदेहाला देतात सिगारेट आनंदाच्या भरात सांगाड्यासह नाचलेत महिला Hull General Cemetery जवळ हे दृश्य पाहण्यासाठी लोकांनी आपल्या गाड्या स्लो केल्या आणि महिलेला सांगाड्यासोबत नाचताना पाहून हैराण झाले. महिलेने एखाद्या नन प्रमाणे क्रीम कलरचा ड्रेस आणि स्कार्फ लावला होता. ती सांगाड्यांसह खूप आनंदात दिसत होती. इतकच नाही तर माणसाच्या सांगाड्यासह ती डान्स करीत होती. एका कुत्र्याच्या सांगाड्यासहदेखील ती खेळत होती. या घटनेचा व्हिडीओ करणारे अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 50 वर्षांपासून या कब्रिस्तानचा वापर नाही हे दृश्य पाहणाऱ्या अनेकांटं म्हणणं आहे की, नाचणारी ही नन कोणा स्ंटट वा आर्ट प्रोजेक्टचा भाग आहे. यामागील कारण तरी अद्याप समजलं नाही, मात्र भरदिवसा स्मशानात घडलेला हा किस्सा चर्चेचा विषय ठरला आहे. हे स्मशान गेल्या 50 वर्षांपासून वापरात आलेले नाही. अद्यापही हे ठिकाण शहरातील ऐतिहासिक क्षेत्र म्हणून आहे. 1847 मध्ये तयार केलेल्या कब्रिस्तान 1972 मध्ये बंद करण्यात आलं होतं. 1800 च्या दरम्यान अधिकतर कॉलरा महासाथीतून मृत्यू झालेल्याचे मृतदेह तेथे दफन करण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या