JOIN US
मराठी बातम्या / विदेश / नव्या कोरोनाची भीती! आणखी एका देशात ख्रिसमस कार्यक्रम रद्द

नव्या कोरोनाची भीती! आणखी एका देशात ख्रिसमस कार्यक्रम रद्द

कोराना व्हायरसच्या (Coronavirus ) संक्रमणावर प्रभावी औषध अजूनही सापडलेले नाही. सर्व जगभर हे औषध (Co vaccine) शोधण्याचे युद्ध पातळीवर सुरु आहेत. हा धोका कायम असतानात ब्रिटनमधून (Britain) एक भीतीदायक बातमी आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 20 डिसेंबर :  कोराना व्हायरसच्या (Coronavirus ) संक्रमणावर प्रभावी औषध अजूनही सापडलेले नाही. सर्व जगभर हे औषध (Co vaccine) शोधण्याचे युद्ध पातळीवर सुरु आहेत.  हा  धोका कायम असतानात ब्रिटनमधून (Britain)  एक भीतीदायक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या (COVID-19 ) नव्या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देशातील ख्रिसमस बबल (Christmas bubble) रद्द करण्याची घोषणा केली आहे. युरोपातील जर्मनीनेही (Germany) यापूर्वी ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या कालखंडात देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे ब्रिटनला धोका वाढला! ब्रिटनचे आरोग्य सचिन मॅट हँकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ईशान्य भागात कोरानाच्या नव्या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या भागातील 1000 पेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आहे. संपूर्ण ब्रिटनमध्येही या महिनाभरात कोरोना व्हायरसचे पेशंट वाढले आहेत. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांनी राजधानी लंडन आणि ईशान्य भागातील नागरिकांना 30 डिसेंबरपर्यंत घरात राहण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनमधील केंट शहरामध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा पेंशट सर्वात प्रथम आढळला होता. त्यानंतर या प्रकाराचा वेगानं प्रसार होत आहे. देशातील आरोग्य विभागाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (WHO) याबाबत माहिती दिली आहे. या नव्या ‘कोरोना व्हायरस स्ट्रेन’ चा (New strain of Coronavirus) देशात वेगाने फैलाव होत आहे. या आजारावर कोरोनाचे औषध लागू होईल का? याबात अजून कोणतीही माहिती देणे शक्य नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ख्रिसमस बबल रद्द कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने पंतप्रधान जॉन्सन यांनी देशातील ख्रिसमस बबल रद्द केला आहे. यापूर्वी ख्रिसमसच्या कार्यक्रमांसाठी नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकानं घेतला होता. राजधानी लंडनसह अनेक भागात तिसऱ्या श्रेणीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या भागात गरज पडली तर लवकरच चौथ्या श्रेणीचे निर्बंध लादण्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या