JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेत नव्या संकटाने उडाली खळबळ, पहिल्यांदाच सापडली अत्यंत जहाल जीवघेणी माशी  

अमेरिकेत नव्या संकटाने उडाली खळबळ, पहिल्यांदाच सापडली अत्यंत जहाल जीवघेणी माशी  

या माशा मोठ्या प्रमाणावर तयार झाल्या आणि त्यांनी शहरात किंवा गावांमध्ये धाड टाकली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

Asian giant hornets from Japan are shown in a display case at the Washington state Department of Agriculture, Monday, May 4, 2020, in Olympia, Wash. The insect, which has been found in Washington state, is the world's largest hornet, and has been dubbed the "Murder Hornet" in reference to its appetite for honey bees, and a sting that can be fatal to some people. (AP Photo/Ted S. Warren)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन 05 मे: कोरोनाविरुद्ध सर्वात मोठी लढाई लढत असलेल्या अमेरिकेत नव्या संकटाची चाहूल लागल्याने खळबळ उडाली आहे. जगातला सर्वात शक्तिशाली देश असलेला अमेरिका सध्या कोरोनापुढे हतबल ठरला आहे. एखाद्या व्हायरसने अमिरेकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे बळी घेतले आहे. ही लढाई सुरू असतानाच आता जीवघेणी माशी शास्त्रज्ञांना आढळली आहे. ही माशी दोन तीन वेळा माणसाला चावली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो एवढा विषारी डंख त्या माशीचा असून अमेरिकेत ती पहिल्यांदाच दिसल्याने खळबळ उडाली आहे. ती अत्यंत जहाल असल्याने तीला ‘Murder Hornet’ असंही म्हटलं जातं. वॉशिंग्टन राज्यात ही जीवघेणी माशी आढळली आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. दोन इंच लांब असलेली ही माशी मधमाशांसाठीही धोकादायक असते. ती मधमाशांना मारूनच टाकते. त्यामुळे वॉशिंग्टन राज्यात मधमाशा पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून मधमाशा मरून पडत असल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या माशीचं प्रमाण वाढलं तर ती माणसांसाठी धोकादायक ठरू शकते. या माशा मोठ्या प्रमाणावर तयार झाल्या आणि त्यांनी शहरात किंवा गावांमध्ये धाड टाकली तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेती आणि निर्सगचक्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांनाही ही जीवघेणी माशी मारून टाकते.

या जीवघेण्या माशांना कसा अटकाव करायचा यावर आता कृषी शास्त्रज्ञ विचार करत आहे. जपानमध्ये या माशीमुळे मोठ्या संख्येने माणसांचा बळी गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या