JOIN US
मराठी बातम्या / विदेश / तैवानसाठी सोडलं अन् जपानमध्ये पोहोचलं; China-Taiwan मिसाइल्स हल्ल्यातील विचित्र घटना

तैवानसाठी सोडलं अन् जपानमध्ये पोहोचलं; China-Taiwan मिसाइल्स हल्ल्यातील विचित्र घटना

चिनी सैनिकांनी आतापर्यंत तैवान बॉर्डरवर अनेक मिसाइल्स सोडल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : अमेरिकी स्पीकर नैन्सी पेलोसी यांच्या तैवान यात्रेमुळे चीन संतापल्याचं दिसत आहे. चिनी सैनिकांनी तैवान बॉर्डरवर अनेक मिसाइल्स सोडल्या आहेत. सैन्य अभ्यासाच्या दरम्यान तैवानच्या जवळपास असलेल्या पाण्यात अनेक बॅलिस्टिक मिसाइल्स सोडण्यात आल्या आहेत. ताइपेच्या संरक्षण मंत्रालयाने ही शांतता भंग करणारी तर्कहीन कारवाई असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, काही मिसाइल्स या जपानवरही पडल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच अशी काही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जपानच्या  economic zone मध्ये हा मिसाइल्स हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. आता जपान यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, चिनी कम्युनिस्ट पार्टीने आज दुपारी साधारण 1 वाजून 56 मिनिटांनी पूर्वोत्तर आणि दक्षिण-पश्चिमी तैवानच्या जवळपास डोंगफेल भागात अनेक बॅलिस्टिक मिसाइल्स सोडल्या आहेत.

संबंधित बातम्या

G-7 च्या विरोधात चीनचा संताप.. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, कंबोडियात आसियान कार्यक्रमांच्या निमित्ताने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि त्यांचे जपानी समकक्षामधील बैठक रद्द करण्यात आली. एका नियमित मीडिया ब्रिफिंगमध्ये मंत्रालयाचे प्रवक्ता चुनयिंग यांनी सांगितलं की, तैवानच्या संदर्भात ग्रुप ऑफ सेव्हनने केलेल्या संयुक्त वक्तव्यामुळे चीन खूप नाराज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या