JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Yuck! चप्पल विकण्यापूर्वी मॅनेजरचा किळसवाणा प्रकार; Video मुळे भयंकर प्रकार उघड

Yuck! चप्पल विकण्यापूर्वी मॅनेजरचा किळसवाणा प्रकार; Video मुळे भयंकर प्रकार उघड

आपण विकत घेतलेल्या वस्तूत एखादी घृणास्पद गोष्ट घातलेली आहे, तर त्या ग्राहकाचं डोकं फिरेलच

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 जानेवारी : जेव्हा ग्राहक एखाद्या दुकानात काही नवं सामान खरेदी करायला जातात, तेव्हा ते सामान, वस्तू स्वच्छ आणि कोणीही न वापरलेल्या असतील, अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते; पण समजा ग्राहकाला असं कळलं, की आपण विकत घेतलेल्या वस्तूत एखादी घृणास्पद गोष्ट घातलेली आहे, तर त्या ग्राहकाचं डोकं फिरेलच ना! कॅनडामध्ये (Canada) ओंटारियो (Ontario) येथे एका शू स्टोअर मॅनेजरच्या अशाच एका घाणेरड्या, घृणास्पद सवयीबद्दल कळल्यानंतर ग्राहक सर्दच झाले आहेत. Daily Star ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, ओंटारियोमधला चपलांच्या एका स्टोअरचा मॅनेजर विक्रीसाठीच्या चपला मुख्य दुकानात देण्याआधी त्यात आपलं वीर्य (Semen) घालत असे. त्याच्याच काही व्हिडिओजवरून ही घृणास्पद गोष्ट उघड झाली आहे. हे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्या ग्राहकांना याबद्दल कळलं आहे, ते साहजिकच प्रचंड नाराज झाले आहेत. (Shoe Store Manager’s Weird Habit) शू स्टोअरच्या त्या मॅनेजरवर असा आरोप आहे, की चपला स्टॉक रूममधून दुकानात विक्रीसाठी आणण्यापूर्वी तो त्यात आपलं वीर्य पाडत (Masturbation) असे. या संदर्भातला व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल (Viral Video) होत असून, आरोपी मॅनेजर ही किळसवाणी कृती करताना त्या व्हिडिओत दिसत आहे. त्या दुकानातून चपलांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या घटनेनंतर धक्का बसला असून, ते नाराज झाले आहेत. ते त्या स्टोअर मॅनेजरसोबतच संबंधित कंपनीवरही (Shoe Company) प्रचंड राग व्यक्त करत आहेत. दरम्यान, संबंधित कंपनीने यावर स्पष्टीकरण देऊन आपली बाजू मांडली आहे. हे ही वाचा- प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं अर्धा किलो सोनं; एअरपोर्टवर 1 तास बसवून ठेवल्यानंतर संबंधित स्टोअर मॅनेजरने स्वतःच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले. त्यात तो हे अत्यंत घाणेरडं कृत्य (Ejaculation) करताना दिसत होता. त्यानंतरच ही गोष्ट उघड झाली होती. ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी (Mentally Disturbed) असल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित कंपनीने या स्टोअर मॅनेजरवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून, अशा तऱ्हेचं घृणास्पद कृत्य कोणत्याही स्थितीत खपवून घेतलं जाणार नाही, असंही कंपनीने म्हटलं आहे. याआधीही अशा काही घटना उघडकीस आल्या आहेत, की ज्यात आरोपी सार्वजनिक ठिकाणी अशी किळसवाणी, घाणेरडी कृत्यं करताना कॅमेरात टिपले गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या