JOIN US
मराठी बातम्या / विदेश / स्वयंपाक सोडून दारू ढोसायला गेला नवरा; भुकेल्या बायकोनं रागात त्याचा Private part कापला आणि...

स्वयंपाक सोडून दारू ढोसायला गेला नवरा; भुकेल्या बायकोनं रागात त्याचा Private part कापला आणि...

दारूच्या नशेत नवऱ्याला पाहून बायको इतकी भडकली की तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँकॉक, 05 मार्च : बऱ्याच महिलांना आपल्या नवऱ्याने दारू प्यायलेलं बिलकुल आवडत नाही. दारू पिणाऱ्या नवऱ्यांना त्या चांगल्याच अद्दलही घडवतात, त्याला शिक्षा देतात. काही महिला आपल्या बेवड्या नवऱ्याशी बोलत नाही, काही जेवायला देत नाही, काही तर बांधून ठेवतात आणि चप्पल-झाडू याने मारतातही. पण एका महिलेने तर यापेक्षाही धक्कादायक पाऊल उचललं. तिने आपल्या दारूड्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवरच हल्ला केला. ती इतकी भडकली की त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला (Wife cut husband private part). थायलँडमधील ही धक्कादायक घटना आहे. बुरिराममध्ये राहणारी 43 वर्षांची महिला ऊसतोड मजूर म्हणून काम करते. तिचा नवरा मासेमारी करतो. यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. तिचा नवरा घऱी स्वयंपाकही करत असे. 3 मार्चला रात्री असंच ती काम करून थकूनभागून घरी आली. तिला खूप भूकही लागली होती. पतीने घरी जेवण बनवलं असावं अशी तिला वाटत होतं. पण जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा भांडी पाहून तिला धक्काच बसला. तिच्या नवऱ्याने स्वयंपाक केलाच नव्हता. हे वाचा -  ऑनलाईन गेमिंगचं असं व्यसन; 15 वर्षीय मुलीने पँटमध्ये लघवी केली, खेळणं सोडलं नाही जेवण बनवणं सोडून नवरा मित्रांसोबत दारू प्यायला गेला. दारूच्या नादात तो जेवण बनवायला विसरला हे तिला समजलं. ती त्याची वाट पाहत राहिली पण त्या रात्री तो आला नाही. त्यामुळे ती खूप संतप्त झाली. रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी परतला. त्यानंतर ती भडकली आणि त्याच्यासोबत भांडू लागली. हा वाद इतका विकोपाला गेला की तिने रागात मासे पकडण्याचा भाला उचलला आणि नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर त्याने हल्ला केला. ज्यामुळे त्याचं गुप्तांगांचा निम्मा भाग कापला गेला. भळाभळा रक्त वाहू लागलं. पण तरी त्याला दारूची नशा इतकी चढली होती की इतका भयंकर हल्ला केल्यानंतर त्याला काहीच वाटलं नाही तो तशाच अवस्थेत तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती गंभीर झाली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्याचा प्रायव्हेट पार्ट पुन्हा जोडण्यात आला. त्याला 17 टाके पडले. हे वाचा -  Shocking! पोटात सुरू झाल्या तीव्र वेदना आणि ‘प्रेग्नंट’ झाला 46 वर्षांचा पुरुष झी न्यूज हिंदी ने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या थायलँडच्या आपल्या पत्नीचा रुद्रावतार पाहून तो आता खूप घाबरला आहे. जोपर्यंत तिचा राग शांत होत नाही तोपर्यंत घरी परतणार नसल्याचं तो म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या