JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / 21व्या शतक संपेपर्यंत ही बेटं जगाच्या नकाशावरून गायब होणार; मालदिवला सर्वाधिक धोका

21व्या शतक संपेपर्यंत ही बेटं जगाच्या नकाशावरून गायब होणार; मालदिवला सर्वाधिक धोका

Global Warming: ध्रुवीय बर्फ वितळायला लागला आहे. त्यामुळे हळूहळू समुद्राची पातळी वाढायला लागली आहे. फिजीपासून मालदिवपर्यंत अनेक देश पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. पाहा किती सुंदर बेटं आहेत धोक्यात

0107

गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळायला लागलेला आहे (sea level has been rising caused by global warming). त्यामुळे समुद्राचं पाणी वाढायला लागलयं परिणामी समुद्री द्वीपसमुहातील किनाऱ्याच्या भागात पाणी वाढतंय. त्यामुळे किनाऱ्यावरची शहरं बूडायला लागली आहेत.

जाहिरात
0207

जगभरातले सुंदर द्वीप पुढल्या 60 वर्षांमध्ये पूर्णपणे पाण्यात सामावून जातील असं सांगितलं जातंय. 40 च्या दशकात अमेरिकेचे वैज्ञानिक बेनो गुटेनबर्ग यांनी या संदर्भामध्ये अभ्यास केला होता. त्यांनी संकलीत केलेल्या माहितीचा आजही अभ्यास केला जात आहे.

जाहिरात
0307

90 च्या दशकामध्ये नासाने देखील त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हटलं. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि भीतीदेखील वाढायला लागली. याचंच एक उदाहरण म्हणजे प्रशांत महासागरामध्ये 1000 बेटांचा मिळून बनलेला सोलेमनली द्वीप वेगाने पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. 1993 सालापासून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार इथली 5 बेटं बूडाली आहेत.

जाहिरात
0407

मालदीवला सगळ्या पर्यटकांची पहिली पसंती असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिसॉर्टपण आहेत. 2100 पर्यंत हा देश पूर्णपणे बुडेल अशी भीती वर्ल्ड बँक सारख्या काही संस्थांनी व्यक्त केलीये.

जाहिरात
0507

प्रशांत महासागरामधील पलाऊ द्वीपही बुडण्याच्या परिस्थितीत आहे. पलाऊ नॅशनल वेदर सर्विस ऑफिस ऑफ पॅसिफिक क्लायमेट चेंज प्रोग्रामने यासंदर्भातला अहवाल जारी केलाय. 1993 पासून या भागामध्ये दरवर्षी 0.35 इंच इतकं पाणी वाढतंय. 2090 नंतर हा द्वीप देखील पाण्याखाली जाईल.

जाहिरात
0607

हवाईपासून जवळजवळ अडीचशे किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरामध्ये मायक्रोनेशिया हा देश आहे. 600 बेटांचा मिळून हा द्वीप बनलेला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे याचाही बराचसा भाग पाण्याखाली गेलेला आहे. तर, इथल्या काही बेटांचा आकार छोटा झाला आहे.

जाहिरात
0707

दक्षिण प्रशांत महासागरामध्ये वसलेल्या फिजी बेटावर मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. ध्रुवीय बर्फ विरघळत असल्यामुळे गेल्या काही दशकांपासून या ठिकाणी पाणी वाढतंय. त्यामुळे लवकरच पाण्याखाली जाईल असं युनायटेड नॅशन्स फ्रेमवर्क कन्वेंशन ऑफ क्‍लायमेट चेंज म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या