JOIN US
मराठी बातम्या / विदेश / निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प बेरोजगारांना वेठीस धरत आहेत का?

निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प बेरोजगारांना वेठीस धरत आहेत का?

संबंधित विधेयक अमेरिकन लोकांना 600 डॉलर ऐवजी 2,000 डॉलरची मदत करण्यासंदर्भातलं आहे. या विधेयकासाठी त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांनी देखील सहमती दर्शवली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फ्लोरिडा, 26 डिसेंबर: अमेरिकेचे (America) मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) आता आपल्या सर्व जबाबदाऱ्या झटकताना दिसत आहेत. नुकतच त्यांनी फ्लोरिडा (Florida) येथे गोल्फ (Golf) खेळून नाताळाचा (Christmas) सण साजरा केला आहे. कोरोनामुळं आर्थिक अडचणीत (economical crisis) सापडलेल्या अमेरिकन लोकांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. कारण कोविड आणि सरकारी निधीसंबंधित बिल मध्येच सोडून ते पाम बीचवर सुट्टीसाठी गेले आहेत. यामुळे कोट्यवधी अमेरिकन लोकांना आर्थिक मदत (Help) मिळणार नाही आणि असं झालं तर कोरोना साथीच्या काळात लोकांच्या समस्यांत आणखी भर पडेल. नॅशव्हिलेमध्ये झालेल्या विस्फोटावरही ट्रम्प यांचं मौन व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेड डियर म्हणाले की, शुक्रवारी सकाळी नॅशव्हिले येथे झालेल्या स्फोटाची माहिती अधिकाऱ्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना दिली होती. या स्फोटामागे काहीतरी कटकारस्थान असल्याचा या अधिकाऱ्यांचा संशय आहे. असं असतानाही ट्रम्प हे या विषयावर जाहीरपणे एक शब्दही बोलले नाही.  2 हजार डॉलरच्या निधीच्या चेकवर ट्रम्प यांनी सही केली नाही संबंधित विधेयक अमेरिकन लोकांना 600 डॉलर ऐवजी 2,000 डॉलरची मदत करण्यासंदर्भातलं आहे. या विधेयकासाठी त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांनी देखील सहमती दर्शवली होती. परंतु ट्रम्प यांच्यामुळे हे विधेयक मध्येच अडकून पडलं आहे. ट्रम्प यांनी या 1.4 ट्रिलियन डॉलर्सच्या करारावर सही करण्यास नकार दिल्यास, फेडरल सरकारचं बरंच नुकसान होईल. यामुळं सामान्य नागरिकांसोबतच बेरोजगारांना देण्यात येणारी मदतही थांबेल. कोविडचा फटका बसलेल्या नागरिकांना मिळणारी मदत थांबवणं ही ट्रम्प यांची राजकीय खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकांत मतदारांनी आम्हाला धोका दिला आहे, असा निराधार आरोप डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन्सने केला होता. हाच राग मनात धरून डोनाल्ड ट्रम्प सध्या या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी विलंब लावत असल्याचं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या