JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अजबच! या गावात तरुणांचे दात घासून केले जातात सपाट, कारण आहे आणखी Shocking

अजबच! या गावात तरुणांचे दात घासून केले जातात सपाट, कारण आहे आणखी Shocking

इंडोनेशियात एक अनोखी आणि विचित्र प्रथा पाळली जाते, ज्यात लोकांचे दात (Teenagers teeth filed in Indonesia) घासले जातात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बाली, 08 फेब्रुवारी: गाव बदललं, शहरं बदलली की परंपरा आणि संस्कृती बदलते. जगभरात विविध देश असून प्रत्येक देशात आगळ्या-वेगळ्या प्रथा (Weird Traditions Around the World) पाहायला मिळतात. या परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत. लोकांचा या परंपरावर अतूट विश्वास असतो. काही लोक अशा प्रथांची खिल्ली उडवतात. पण, कोणत्याही प्रथा (Amazing Traditions) या चूक किंवा बरोबर या साच्यात बसत नाहीत. कारण, या प्रथा बाहेरच्या व्यक्तींना अवाक करणाऱ्या असल्या तरी संबंधित लोकांसाठी त्यांचं खास महत्त्व असतं. अशीच एक आश्चर्यचकित करणारी परंपरा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इंडोनेशियात एक अनोखी आणि विचित्र प्रथा पाळली जाते, ज्यात लोकांचे दात (Teenagers teeth filed in Indonesia) घासले जातात. इंडोनेशियामधील दक्षिण बालीमध्ये (Southern Bali, Indonesia) एक गाव आहे. या गावात वर्षानुवर्षांपासून दात घासण्याची आणि ते सपाट करण्याची प्रथा चालत आली आहे. साधारणपणे व्यक्तीच्या तोंडात चार टोकदार दात असतात, ज्यांना केनाइन टीथ (Canine teeth) म्हटलं जातं. यांना मराठीत सुळेही म्हटलं जातं. हे दात मांस किंवा कडक अन्न तोडण्यासाठी वापरले जातात. या दातांचं खूप महत्त्व असतं. पण, बालीतील या गावात हे दात (Filed teeth of teenagers) घासून सपाट केले जातात. हे वाचा- Boycott KFCच्या मागणीने धरला जोर,Pak अकाउंटवरुन केलेली काश्मीरसंबंधी पोस्ट भोवली वर्ष 2017 मध्ये फ्रेंच फोटोग्राफर एरिक लाफोर्ज (Eric Lafforgue) यांनी दात घासण्याच्या संपूर्ण प्रथेवर एक फोटो सिरिज केली होती. यात त्यांनी ही प्रथा का आणि कशी केली जाते, यासंदर्भात तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती. Eric Lafforgue यांनी सांगितल्याप्रमाणे डेली मेल वेबसाइटच्या वृत्तात म्हटलं, मनुष्यात देव आणि राक्षस हे दोघेही वास करतात. या विधीद्वारे व्यक्तीतील राक्षस नष्ट (Teeth filing tradition to ward off evil) केला जातो. टोकदार दात हे प्राणी किंवा दुष्टाचे प्रतीक असतात. त्यामुळे त्यांना घासून सपाट केलं जातं. असं केल्यानं माणसाच्या आतून लोभ, मत्सर, अभिमान किंवा इतरांचे वाईट करण्याची इच्छा नाहीशी होते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. हे वाचा- 1 कोटी 64 लाख जिंकले पण 2 आठवडे त्याला याचा पत्ताच नव्हता! अखेर असं फळफळलं नशीब इंडोनेशियामध्ये पाचव्या शतकात सनातन धर्माने प्रवेश केला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. तरुणाचा आवाजात बदल होऊ लागतो आणि मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा म्हणजे मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर ही प्रथा त्यांच्यासोबत केली जाते. ही प्रथा सुरू करण्याच्या दोन दिवस आधीपासून तरुण-तरुणी प्रार्थना करतात. या प्रथेत एक पंडित फाइलरच्या मदतीने दातांना आकार देतो. या विधीमध्ये कुटुंब आणि मित्र एकत्र येतात. एखाद्या लग्न समारंभाप्रमाणे हा कार्यक्रम पार पाडला जातो. विधी सुरू करण्यापूर्वी दातांनी रुबी अंगठीला स्पर्श केला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण मानले जाते. विधी करत असताना त्यांच्याभोवती घेर घातला जातो आणि विधी पूर्ण झाल्यानंतर उत्सव साजरा केला जातो. ही अनोखी प्रथा आजही पाळली जाते

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या