मुंबई, 18 नोव्हेंबर: ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचं आत्मचरित्र सध्या खूपच चर्चेत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभव शेअर केले आहेत. तसेच या पुस्तकातील भारतीय नेत्यांविषयी आणि राजकारणावरील त्यांनी लिहिलेल्या काही गोष्टीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ओबामा यांनी भारताविषयी आपले अनुभव ज्या पद्धतीने व्यक्त केले आहेत ते मनोरंजक असूनसुद्धा इतके चर्चेत आलेले नाहीत. विविध रहस्य उलगडत ओबामांनी आपल्या पुस्तकात लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीशी त्यांचा कसा संबंध आला याबाबत त्यांनी लिहीलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते भारतात येण्यासाठी किती उत्सुक होते याबाबत लिहिलं आहे. हिंदू धर्मग्रंथांचं आकर्षण नोबेल पुरस्कार विजेते ओबामा लिहितात की, लहानपणापासूनच त्यांच्या मनात हिंदू ग्रंथांना एक विशेष स्थान होते. यामागचे कारण सांगताना त्यांनी लिहिले आहे की, ‘इंडोनेशियामध्ये बालपण गेल्यामुळे ते रामायण आणि महाभारतच्या पुस्तकांचा पगडा त्यांच्या आयुष्यावर आहे.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 2010 मध्ये पहिल्यांदा ओबामा यांना भारत भेट देण्याची संधी मिळाली असली तरी यापूर्वी भारत त्यांच्या विचारांमध्ये तयार होता आणि भारताची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या मनात तयार झालेली होती असेही त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांची आवड कशी लागली? इंडोनेशियात असताना ओबामा हे बालपणापासूनच हिंदू धर्माच्या पौराणिक कथा ऐकायचे. म्हणूनच भारताच्या संस्कृतीचा त्यांच्यावर कायमच प्रभाव होता. याव्यतिरिक्त कॉलेजमधील काळात त्यांचे काही मित्र हे भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे असल्याचे सांगितले याबाबत त्यांनी एक रंजक किस्सादेखील या पुस्तकात लिहिला आहे. भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या मित्रांसोबत राहतांना ते आमटी आणि खिमा तयार करायला शिकले. तसेच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांचादेखील आनंद घेतला. तसेच या व्यतिरिक्त ओबामा यांनी या पुस्तकात महात्मा गांधीबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे. “महात्मा गांधीजींनी लाखो प्रयत्न करूनही जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं नाही. आजही भारताचं राजकारण धर्म, जाती आणि मनुष्य यामध्येच भारत अडकून पडलं आहे. महात्मा गांधींकडून मिळाली प्रेरणा सत्याग्रह आणि गांधीवादी विचारसरणीबद्दल आपले मत मांडताना ओबामा म्हणाले की, “गांधीवादाच्या परिणामामुळे माझं भारताबद्दलचं आकर्षण अधिक वाढलं’ ओबामांनी हेही नमूद केलं की ते गांधींजींचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की, त्यांनी भारत भेटीच्या वेळी महात्मा गांधींच्या निवासस्थानी मणिभवन येथे आपली पत्नी मिशेलसोबत वेळ घालवला होता.