देशभरात उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली जाते, अशी आख्यायिका आहे. भारतातील वेगवेगळ्या शहरांप्रमाणेच जगभरात दिवाळीचा उत्साह दिसून आला.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरला पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त अशी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी आतषबाजीदेखील करण्यात आली.
गुजरातच्या वडोदरामध्ये दिवाळीनिमित्त रंगोली ग्रुपनं रामायणाच्या थिमवर उत्तम रांगोळी रेखाटली. गेल्या सात वर्षांपासून आपण रांगोळी रेखाटण्याचा उपक्रम राबवत असल्याचं या ग्रुपनं सांगितलं. यावेळी रामायणाच्या थिमवर रामाची कथा ऐकवण्यात आली. 20 कलाकार यासाठी गेल्या 14 दिवसांपासून रांंगोळी काढत होते.
दिवाळीच्या रात्री जयपूरच्या रस्त्यांवर मात्र शुकशुकाट जाणवत होता. मात्र प्रत्येक भागात जोरदार रोषणाई करण्यात आली होती.