JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / गीता गोपिनाथ : IMF च्या या नव्या अर्थतज्ज्ञाबद्दल जाणून घ्याव्यात अशा 7 गोष्टी

गीता गोपिनाथ : IMF च्या या नव्या अर्थतज्ज्ञाबद्दल जाणून घ्याव्यात अशा 7 गोष्टी

मूळच्या भारतीय असलेल्या हार्वर्ड स्कॉलर गीता गोपिनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड)प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून सूत्र हाती घेतली आहेत. जगातल्या सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ अशा शब्दात IMFच्या संचालक ख्रिस्तीन लॅगार्ड यांनी गीता यांचा गौरव केला होता.

0108

हार्वर्ड स्कॉलर आणि अर्थतज्ज्ञ गीता गोपिनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(इंटरनॅशनल मॉनिटरी फंड)प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून निवड झाली. या जागी निवड झालेल्या त्या पहिल्या स्त्री अर्थतज्ज्ञ आहेत आणि मूळच्या भारतीय म्हणून आपल्या देशवासीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

जाहिरात
0208

IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून यापूर्वी भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही काम केलंय. राजन पहिल्यांदा IMFच्या मोठ्या पदावर होते आणि त्यानंतर त्यांना भारताने पाचारण केलं आणि रिझर्व बँकेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली हे विशेष.

जाहिरात
0308

गीता गोपिनाथ या मूळच्या दक्षिण भारतीय. म्हैसूरच्या निर्मला कॉन्व्हेंट आणि महाजन एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण भारतातच झालं. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि नंतर त्या जगप्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीत दाखल झाल्या.

जाहिरात
0408

गीता गोपिनाथ यांनी नोटबंदीला तीव्र विरोध दर्शवला होता, पण GSTला त्यांचा पाठिंबा होता. कोणीही अर्थतज्ज्ञ नोटबंदीसारख्या निर्णयाचं स्वागत करेल, असं वाटत नाही, असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

जाहिरात
0508

एवढ्या मोठ्या अर्थतज्ज्ञाकडे आपल्या देशाचं एवढे वर्षं दुर्लक्ष कसं झालं? फक्त केरळच्या मुख्यमंत्र्यांनी गीता यांची गुणवत्ता हेरून त्यांना राज्याची आर्थिक घडी बसवायचं काम सोपवलं होतं. कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि केरळचे सध्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी २०१६मध्ये गीता यांना केरळ सरकारच्या आर्थिक सल्लागार म्हणून नेमलं होतं.

जाहिरात
0608

विजयन यांनी गीता गोपिनाथ यांची निवड केल्यानंतर त्यांना डाव्या विचारांच्या स्वपक्षीयांकडूनही बराच विरोध सहन करावा लागला होता. आर्थिक सुधारणा करण्यासाठी डावी विचारसरणी गुंडाळून ठेवावी लागेल अशी भीती त्यांना होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीपर्यंतही ही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण विजयन यांनी आपला आग्रह सोडला नव्हता.

जाहिरात
0708

मध्यमवर्गीय घरातून आलेल्या गीता गोपिनाथ यांचे आई-वडील केरळचे आहेत. ते दोघेही सध्या म्हैसूरला राहतात.

जाहिरात
0808

IMF च्या प्रमुख अर्थसल्लागाक पदावर गेल्या ऑक्टोबरमध्येच त्यांच्या नावाची घोषणा झाली. गीता यांनी या पदाचा कार्यभार 8 जानेवारीपासून स्वीकारला आहे. IMFच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला हे महत्त्वाचं पद मिळालं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या